बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा या गावातील तब्ब्ल २०० जावई हे भूमिगत झाल्याचे समोर आले आहे. त्याला कारणही तसेच आहे. बीड जिल्ह्यातील विडा येथे निजामाच्या काळापासून एक अनोखी परंपरा जोपसली जात आहे. त्यात धुलिवंदनाच्या दिवशी जावई बापूंची गाढवावरून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. मंगळवारी (दि. ७) रोजी धुलिवंदन असल्याने जवळपास २०० जावई हे भूमिगत […]
संभाजीनगर : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतर वाद थांबायचे काही नाव घेईना. रोज आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच एमआयएमचे खासदार यांनी या नामांतराविरोधात उपोषण सुरु केले आहे. त्यावर एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आंदोलनादरम्यान औरंगजेब यांचे फोटो उंचावल्याने इम्तियाज जलील (Imtiyaj Jalil) यांच्यावर गंभीर आरोप केले. त्या आरोपांना प्रतिउत्तर देताना इम्तियाज जलील यांनी म्हटले की, […]
अहमदनगर : क्षेत्र मढी येथे शेकडो वर्षाची परंपरा असलेली गोपाळ समाजाची मानाच्या होळी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात पेटली. पोलिसांना चकवा देत गडाकडे जाणारा पारंपारिक मार्ग मानकऱ्यांनी अचानक बदलल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत मूळ मार्गाकडे वळवले. त्यामुळे तणाव निवळण्यास मदत झाली. होळी पेटल्यानंतर एक तासाने दोन गटात हाणामारी होऊन एका गटाने दुसऱ्या गटावर अचानक हल्ला केला. पोलिसांनी […]
नई दिल्ली : सीमेवर चीनसोबत सुरू असलेल्या अडथळ्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण गुप्तचर संस्थांनी चिनी मोबाईल फोन्सबाबत सल्लागार जारी केला आहे. सीमेवर तैनात असलेले सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय चिनी मोबाईल फोन वापरू नयेत याची काळजी घेण्यास गुप्तचर यंत्रणांनी सांगितले आहे. संरक्षण गुप्तचर संस्थांनी जारी केलेल्या सल्लागारात असे म्हटले आहे की, विविध फॉर्म आणि चॅनेलद्वारे, त्यांच्या कर्मचार्यांना अशा […]
पुणे : पुणे (Pune District) जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यासह राज्यातील अहमदनगर, नाशिक, धुळे (Dhule), नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद (Aurangabad), बुलढाणा आणि जालना (Jalna) या जिल्ह्यातील काही भागात पुढील तीन तास विजांचा कडकडाटा, गारांसह वादळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने (India Meteorological Department) केले आहे. […]
पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नावाने बोंब मारत तसेच ‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा देत होळी सण साजरा केला. तसेच वाढत्या महागाई मुळे त्रस्त झालेल्या जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी यावेळी घरगुती गॅस सिलिंडरची (Gas Cylinder) प्रतिकृती तयार करून ती […]
अहमदनगर : कानिफनाथ महाराज की जय,असा जयघोष करत कैकाडी समाजाची मानाची काठी कळसाला व समाधीला भेटून श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथांचा यात्रा उत्सवाची आजपासून सुरुवात झाली. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत ही यात्रा चालते. धार्मिक परंपरेनुसार वारी रविवारी (ता.५) रात्री पाथर्डी शहरातून वाजतगाजत मानाच्या काठीची मिरवणूक निघाली. डफांचा पारंपारिक तालात मिरवणूक’ रात्रभर मिरवत सकाळी मढीला आली. ग्रामप्रदक्षिणा […]
अगरतळा : त्रिपुराच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाले आहे. पक्षाने माणिक साहा यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत माणिक साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. बुधवार, 8 मार्च रोजी मुख्यमंत्री आणि नवनिर्मित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित […]
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर (Yogesh Bhoir) यांच्या घरावर अँटी करप्शन ब्युरो (Anti Corruption Bureau) छापेमारी केली. ३ तास चाललेल्या छापेमारीत त्यांच्याकडे ८५ लाखांची अधिकची मालमत्ता सापडली असल्याने एसीबीने योगेश भोईर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मालाड, कांदिवली पूर्व येथील माजी नगरसेवक तसेच मागाठाणेचे उपविभाग प्रमुख […]
ठाणे : कळव्यामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची स्थिती ही काय आज वाईट झालेली नाही. वर्षेनुवर्षे या रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकटच होत गेली. खरतरं इतक्या उत्कृष्ट अन् मोठ्या जागेत फार सुंदर असे रुग्णालय चालवता आले असते. पण, माझे आजहीच हेच म्हणणे आहे की, ठाणे महानगरपालिकेचे उत्पन्न पाहता आणि गेल्या काही वर्षांतील या रुग्णालयाची अवस्था पाहता हा […]