पुणे : ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे पंच असलेले मारुती सातव यांना धमकीचा फोन आला आहे. यासंदर्भात स्पर्धा नियोजन समितीचे अध्यक्ष पै. संदीप उत्तमराव भोंडवे यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. भोंडवे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे की, ’10 ते 14 जानेवारी दरम्यान कोथरूड येथे 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये […]
मुंबई : किंग खान शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाची जगभरातून अॅडव्हॅान्स बुकींग सुरू झाली आहे. पठाणच्या भारताशिवाय जगभरातून होत असलेल्या अॅडव्हॅान्स बुकींगचा आकडाही कामालीचा मोठा आहे. जगभरात किंग खान शाहरुख खानचे चाहते आहेत. हे चाहते सध्या शाहरुखचा बहुचर्चित चित्रपट ‘पठाण’ अत्यंत वाट पाहत आहेत. 25 जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. एका रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलिया, जर्मनी […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातून पक्षाविरोधात बंड करून अपक्ष निवडणूक अर्ज भरणारे सत्यजित तांबे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. तर आता सोशल मिडीयावर सत्यजित तांबे यांच्या फोटोसह एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘जी माणसं माझ्या कठीण काळात माझ्याबरोबर असतील त्यांना माझा शब्द आहे. माझा चांगला काळ फक्त तुमच्यासाठीच असेल. – […]
अहमदनगर : पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन करुन शिस्तभंग केल्याप्रकरणी डॉ. सुधीर तांबे यांच्यावर कॉंग्रेसकडून निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. त्यानंतर आता सत्यजित तांबेंवरही पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सत्यजित तांबेंवर कारवाई करू शकतात.कारण अखिल भारतीय काँग्रेस शिस्तपालन समिती आमदार, खासदार, केंद्रीय समितीतील पदाधिकाऱ्यांवर कारवाई करते. राज्यातील इतर पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा अधिकार प्रदेश काँग्रेसला असतो. […]
मुंबई : गोल्डन ग्लोब्स अॅवॉर्ड 2023 मध्ये जिंकल्यानंतर दाक्षिणात्य चित्रपट ‘आरआरआर’ ने देशाची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे. आरआरआर या चित्रपटाला आता क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्समध्येही बेस्ट फॉरेन लॅंग्वेज त्याचबरोबर चित्रपटातील ‘नाचो नाचो’ या गाण्याला देखील बेस्ट ओरिजनल सॉन्ग हे अॅवॉर्ड मिळाले आहे. 28 व्या क्रिटिक्स चॉइस अॅवॉर्ड्सच्या ट्विटर हॅंडलवरून या संदर्भात माहिती देण्यात आली. […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतून धनंजय जाधव यांनी माघार घेतली आहे. भाजप नेते गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानंतर निवडणुकीतून धनंजय जाधव यांनी माघार घेतली आहे. यावेळी धनंजय जाधव म्हणाले की, ‘भाजप नेते गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार मी माझा नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेत […]
ठाणे : ठाण्यामध्ये ‘धर्मवीर आनंद दिघेसाहेब चषक 2023’ या क्रिकेट स्पर्धेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिच राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅंटिंगही केली. ठाणे शहरात टेंभी नाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे यांच्याकडून ही स्पर्धा आयोजित केली जाते. ही मोठी क्रिकेट स्पर्धा असून यामध्ये अनेक संघ सहभागी झाले आहेत. […]
कोल्हापूर : माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा टाकत कारवाई केली. त्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या हे या कारवाईनंतर पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मुश्रीफांवर टीका केली. ‘मुश्रीफांनी मला काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात जाण्यापासून रोखले होते. तसेच आता ईडीने छापा टाकत कारवाई केल्यानंतर मुश्रीफांना धर्म आठवला आहे.’ असं देखील सोमय्या […]
धुळे : नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून सत्यजित तांबे यांनी फॉर्म भरल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडली होती. तर दुसरीकडे धुळे येथील शुभांगी पाटील यांना भाजपने ए बी फॉर्म दिला नव्हता. आता नाशिक पदवीधर निवडणुकीत एक मोठ ट्विस्ट समोर आला आहे. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील उमेदवार यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. सत्यजित तांबेंना टक्कर देणाऱ्या […]
पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे. हा किताब पटकवण्यासाठी माती विभागातून सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे हे सज्ज झाले आहेत. हे सगळेच पट्टीचे पैलवान असल्याने स्पर्धेत मोठी रंगत पाहायला मिळत आहे. मात्र अत्तापर्यंत झालेल्या एकूण स्पर्धेत सिकंदर शेख हा सगळ्याच पैलवानांना उजवा ठरल्याचे चित्र […]