Adipurush : वादग्रस्त संवाद बदलणार; प्रचंड टिकेनंतर निर्मात्यांचा मोठा निर्णय
Adipurush Movie Latest Update : ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आला आहे. हा सिनेमा रिलीज होण्यापासूनच या सिनेमावर चांगलीच टीका होत आहे. सिनेमातील दृश्ये, संवाद, व्हीएफएक्स अशा अनेक गोष्टींवर टीका होत आहे. परंतु आता ‘आदिपुरुष’ सिनेमाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. आठवड्याभरात या सिनेमातील वादग्रस्त संवाद बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
‘आदिपुरुष’ सिनेमातले वादग्रस्त संवाद बदलण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसामध्ये सिनेमाची सुधारित आवृत्ती सिने-रसिकांसमोर येणार आहे. आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. ज्या संवादांमुळे जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, ते संवाद बदलण्याचा निर्णय निर्माते आणि दिग्दर्शकाने घेतला आहे, असं मुंतशीर यावेळी म्हणाले आहेत.
‘500 कोटींवर 50 सेकंद भारी’; आदिपुरुषच्या ट्रोलिंगनंतर शाहरुखचा ‘तो’ सीन व्हायरल
‘आदिपुरुष’चा टीझर रिलीज झाल्यापासूनच या सिनेमावर जोरदार टीका होत आहे. जेव्हा रावणाच्या भूमिकेमध्ये असलेला सैफ अली खान एका वटवाघुळावरुन येत असताना दाखवला गेला तेव्हा ट्रोलिंगला सुरुवात झाली. सिनेमातील रावण हा अल्लाउद्दीन खिलजी किंवा एखादा मुघलकालीन क्रूर शासक असावा अशा पद्धतीने रेखाटण्यात आला आहे. ‘आदिपुरुष’ सिनेमातील हनुमानाची चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने ही भूमिका साकारली आहे. पण जेव्हा त्याचा फर्स्ट लुक समोर आला, तेव्हा लोकांनी हा हनुमान मुस्लिम धाटणीचा वाटल्याची टीका सुरू करण्यात आली.
Ketaki Chitale: केतकी चितळे वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत, आता नेमके काय झाले?
‘आदिपुरुष’ हा सिनेमा अतिभव्य बनवण्यासाठी व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. यावर तब्बल ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु त्याचा प्रभाव मात्र ५ कोटींचा येत नसल्याची तक्रार चाहते करत आहेत. ट्रेलरमधले डायलॉग जेव्हा समोर आले तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही. परंतु सिनेमातील डायलॉगवर देखील आता टीका होत आहे. संवादलेखक मनोज मुंतशीर सध्या फक्त ट्रोलिंग सहन करत आहेत.
‘आदिपुरुष’ या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas), कृती सेनन (Kriti Sanon), सैफ अली खान (Saif Ali Khan) मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 140 कोटींची मोठी कमाई केली आहे. तर दुसऱ्याच दिवशी हा सिनेमा 200 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज वर्तवला जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.