Adipurush: “जलेगी तेरे बाप की…”, बजरंग बलीच्या तोंडी असलेला ‘तो’ संवाद ऐकून प्रेक्षकांचा संताप

Adipurush: “जलेगी तेरे बाप की…”, बजरंग बलीच्या तोंडी असलेला ‘तो’ संवाद ऐकून प्रेक्षकांचा संताप

Adipurush Trolls For Hanuman Dialouge: आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपट रामायणावर आधारित असून लहानांपासून मोठ्यांना माहिती असलेली ही पौराणीक कथा रुपेरी पडद्यावर वेगळ्या अंदाजात सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (Adipurush Movie Released ) तर सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा अखेर रिलीज झाला आहे. (Adipurush Movie ) ओम राऊत दिग्दर्शित हा सिनेमा टीजर रिलीज झाल्यापासूनच चांगलंच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

यानंतर मध्यंतरी ट्रेलर बघून परिस्थिती जरा सुधारली आणि चाहत्यांमध्ये पुन्हा आदिपुरुषची क्रेझ निर्माण झाली. परंतु अगदी सकाळी लवकर उठून सिनेमाला गेलेल्या आणि गर्दी करून आदिपुरुष बघणाऱ्या सर्वच चाहत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. कालपासून या सिनेमावर प्रचंड टीका होत आहे. सिनेमातील व्हिएफएक्स, पात्रांचे कपडे, रावणाचा अवतार सगळ्यावरच लोक सडकून टीका करत असल्याचे दिसून येत आहेत. आता सिनेमातील हनुमानाचे संवाद देखील चांगलंच समोर येत आहे.

‘आदिपुरुष’ वादाच्या भोवऱ्यात, हिंदू सेनेची हायकोर्टात याचिका

बजरंग बलीच्या तोंडी असे छपरी डायलॉग का घातले म्हणून चाहत्यांनी निर्मात्यांना चांगलेच धारेवर धरले असल्याचे दिसून येत आहे. या सिनेमातील बजरंग बलीच्या संवादावरून आता मोठा वाद पेटला आहे. बजरंग बलीचे संवाद हे राम कथेला शोभा देणारे नाही, असे मत चाहते व्यक्त करत आहेत. सिनेमात बजरंग बलीच्या तोंडी असलेले सामान्य भाषेतील संवाद ऐकून चाहत्यांना राग अनावर झाला आहे. सोशल मीडियाद्वारे या संवादावरुन ‘आदिपुरुष’ला ट्रोल करण्यात येत आहे.

Adipurush च्या रेकॉर्डब्रेक कमाईमागे तुमचाही फायदा होणार! जाणून घ्या गणित…

‘कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, तो जलेगी भी तेरे बाप की..” असा संवाद बजरंग बलीच्या तोंडून आले असल्याचे दिसून येत आले आहे. हा संवाद ऐकून चाहत्यांनी अक्षरशः मोठा संताप व्यक्त केला आहे. बजरंग बलीचा असा संवाद कसा काय असू शकतो?, तो हनुमान आहे कुणी छपरी नाही.., देवाच्या तोंडी असे डायलॉग देताना किमान देवाला तरी घाबरा.. अशा शब्दात चाहत्यांनी चांगलंच समाचार घेतला आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

यामुळे आता हा सिनेमा चर्चेचा नाही तर टीकेचा विषय झाला आहे. ‘आदिपुरुष’वर सोशल मीडियावर अक्षरशः टोळ धाड उठली आहे. या सिनेमाने चाहत्यांना चांगलाच अपेक्षाभंग केला आहे. या सिनेमात प्रभास श्रीराम राम, क्रिती सेनॉन सीता आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेमध्ये आहेत. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे बजरंग बलीच्याच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नडमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube