Pushkar Jog : दादागिरीची भाषा करणारा ‘पुष्कर’ नरमला; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर मागितली माफी

Pushkar Jog : दादागिरीची भाषा करणारा ‘पुष्कर’ नरमला; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर मागितली माफी

Pushkar Jog Apology : मराठी अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) सध्या चर्चेत आहे. त्याच्या घरी आलेल्या मुंबई महापालिकेच्या (Mumbai News) कर्मचाऱ्यांना केलेल्या वक्तव्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. या वक्तव्यावर जोरदार टीका झाल्यानंतर आज अखेर पुष्करला शहाणपण सुचलं. अगोदर लाथ घालण्याची भाषा करणाऱ्या पुष्कर जोगने दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतरही त्याच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया येतच आहेत. दरम्यान, आपण केलेल्या वक्तव्यावर वाद वाढत असल्याचे लक्षात येताच पुष्करने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहीली. यामध्ये त्याने वादग्रस्त वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली.

आमदार पात्रतेच्या निकालानंतर किरण मानेंची पोस्ट चर्चेत! म्हणाले, जब बंदूक न हुई, तब तलवार होगी 

मराठा समाजाचे मागासेपण तपासण्यासाठी राज्यात सर्वेक्षणाचे युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी सरकारी कर्मचारी घरोघर फिरून माहिती गोळा करत आहेत. या सर्वेचा भाग म्हणून मुंबई महापालिकेचे कर्मचारी पुष्कर जोगच्या घरी गेले होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्याला जात विचारली. यावर पुष्कर चांगलाच भडकला होता. यानंतर त्याने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवरून अनेकांनी त्याला चांगलेच ट्रोल केले होते. ठाकरे गटाचे नेते आणि मराठी अभिनेते किरण माने (Kiran Mane), राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी देखील पु्ष्करला कठोर शब्दांत फटकारले होते. यानंतर पुष्कर जोगने दिलगिरी व्यक्त करणारी पोस्ट लिहित वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

‘मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी’, अशा शब्दांत पुष्करने या वादाला त्याच्याकडून पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.’

‘Musafiraa’ ची सफर घडवणारे तिसरे गाणे रिलीज; ‘झिलमिल’ मधून झळकले मैत्री अन् प्रेम

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube