मुंबई : आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. लंडनमधील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. स्वत: ललित मोदी यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत माहिती दिली आहे. तसंच त्यांना पुढील उपचारासाठी लंडनला एअरलिफ्ट करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं असून त्याचेही फोटो पोस्ट […]
दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या कार्यालयावर सीबीआयने छापा टाकल्याचा आरोप केला आहे. शनिवारी संध्याकाळी 4 वाजता त्यांनी ट्विट केले की, “आज पुन्हा सीबीआय माझ्या कार्यालयात पोहोचली आहे. त्यांचे स्वागत आहे. त्यांनी माझ्या घरावर छापा टाकला, माझ्या कार्यालयावर छापा टाकला, माझ्या लॉकरची झडती घेतली, माझ्या गावातही तपास केला. माझ्याविरुद्ध काहीही मिळाले नाही. ते […]
नवी दिल्ली : लोकसभा सचिवालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खासदाराचे सदस्तत्व रद्द केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेतील सदस्य संख्या एकाने कमी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यासंदर्भातील अधिसूचनाही काढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना अपात्र ठरवले आहे. फैजल यांना न्यायालयाने हत्येचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात दोषी […]
नवी दिल्लीः राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली. यात्रेत चालताना काँग्रेसचे खासदार संतोखसिंह चौधरी यांना अचानक छातीत दुखू लागले.अस्वस्थ वाटू लागले. आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. संतोखसिंह चौधरी यांना ह्द्यविकाराचा झटका आल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. मात्र उपचारादरम्यान संतोखसिंह यांचा मृत्यू झाला. खासदार संतोखसिंह चौधरी भारत जोडो यात्रेत चालत होते. त्यावेळी चालत […]
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. यादरम्यान 66 दिवसांत 27 बैठका होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. दरम्यान, 14 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असणारा आहे. प्रल्हाद जोशी म्हणाले, संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2022 ते 29 डिसेंबर 2022 या […]
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या रामनगर बंदरावरुन एमव्ही गंगा विलास ही क्रूझ बांग्लादेशमार्गे आसाममधील दिब्रुगढपर्यंत तीन हजार 200 किमीचा प्रवास करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या जगातील सर्वात लांब अंतराच्या नदीतील क्रूझला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आज सकाळी 10 : 30 च्या सुमारास पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच वाराणसीतील गंगा नदीच्या किनाऱ्यावरील […]