नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, त्याचे केंद्र अफगाणिस्तानमधील फैजाबाद होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 होती आणि ती संध्याकाळी 7.55 वाजता आली. सध्या कोठूनही कोणत्याही प्रकारची हानी झाल्याची माहिती नाही. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा, फरिदाबाद आणि गुरुग्राममध्ये लोकांना […]
नवी दिल्ली : झारखंडमधील पारसनाथ येथे असलेल्या जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र राहणार असून तीर्थक्षेत्र परिसरात बांधकाम, हॉटेल, ट्रेकिंग आणि मांसाहारावर बंदी घालण्यात आल्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, हे पवित्र स्थळ यापुढे पर्यटन क्षेत्र राहणार नाही. सर्व पर्यटन आणि इको-टूरिझम उपक्रमांवर बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. […]
बेळगाव : जिल्ह्यातील सौंदत्तीमधील यल्लमा देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळानं घाला घातलाय. भक्तांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू झालाय. रामदुर्ग तालुक्याच्या चिंचनूर गावाजवळ बुधवारी मध्यरात्री हा अपघात झालाय. अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. देवीच्या दर्शनासाठी पिकअप वाहनातून हे भाविक प्रवास करत होते. नागमोडी रस्त्यामुळं ताबा सुटून वाहन […]
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत एका 20 वर्षीय तरुणीला कारनं तब्बल 12 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी अशाच प्रकारची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एका स्कुटीचालक महिलेला ट्रकनं धडक देऊन तिचा मृतदेह तीन किलोमीटरपर्यंत फरफटत नेलाय. अपघातग्रस्त महिला आपल्या स्कुटीसह ट्रकमध्ये अडकल्यानं ट्रकला आग लागली. या दुर्दैवी घटनेत पीडितेची स्कूटीही […]
नवी दिल्ली : देशात सध्या उसाचा गळीत हंगाम सुरु आहे. हंगाम सुरु असतानाचं एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झालीय. या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) देशातील साखरेचं उत्पादन 120 लाख टनांवर गेलं आहे. यावरुन देशातील साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचं समजतंय. देशातील विविध राज्यात साखरेचं मोठं उत्पादन झालं आहे. त्यामुळं […]
मुंबई : कोलकाताच्या प्रसिद्ध गायिका सुमित्रा सेन यांचं निधन झालं आहे. गेल्या महिन्यात सुमित्रा सेन यांची प्रकृती खालावली होती. सुमित्रा सेन यांना २९ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांनी डिस्चार्ज देखील मिळाला. पण घरी आल्यानंतर सुमित्रा सेन यांचं निधन झालं. सुमित्रा सेन यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची […]