उपासमारीचं संकट ‘गडद’! जगातील तब्बल ‘इतके’ लोक भूकेनं व्याकूळ

उपासमारीचं संकट ‘गडद’! जगातील तब्बल ‘इतके’ लोक भूकेनं व्याकूळ

Food Crisis in World : संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार दक्षिण सुदान, बुर्किना फासो, सोमालिया आणि माली या देशात उपासमारीच्या (Food Crisis in World) समस्येने विक्राळ रुप धारण केलं आहे. तसेच इस्त्रायल-हमास युद्ध (Israel Hamas War) आणि रशिया युक्रेन युद्धाने या समस्येत (Russia Ukraine War) आणखी भर घातली आहे. आता तर संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे की गाझा भागातील 11 लाख लोक आणि दक्षिण सुदानमधील 79 हजार लोक जुलैपर्यंत या संकटात आणखी अडकू शकतात.

मागील वर्षात जगातील 59 देशांतील तब्बल 28.2 कोटी लोक उपासमारीने हैराण झाले होते. या लोकांना खाण्यापिण्याच्या (Global Report on Food Crisis) वस्तूंच्या टंचाईचा सामना करावा लागला. यामुळे गाझा पट्टी आणि सूदानमध्ये परिस्थिती खराब झाली होती. संयुक्त राष्ट्रांच्या खाद्य आणि कृषी संघटनेचे मुख्य अर्थतज्ज्ञ मॅक्सिमो टोरेरो यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी मानवी भूकेचे एक परिमाण निश्चित केले आहे. यामध्ये पाच देशांतील 7 लाख 5 हजार लोक पाचव्या टप्प्यात आहेत. हा टप्पा जास्त धोकादायक आहे.

Sri Lanka Power Cut : श्रीलंकेत बत्ती गुल! संपूर्ण देशात वीजपुरवठा बंद, कारण काय ?

सन 2016 पासून अहवाल प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाल्यापासून उपासमार होणाऱ्या लोकांची आताची संख्या सर्वाधिक आहे. या रिपोर्टनुसार, दक्षिण सूदान, बु्र्किना फासो, सोमालिया आणि मालीमध्ये हजारो लोक भूकेने व्याकूळ झाले आहेत. आता गाझातील 11 लाख लोक आणि दक्षिण सूदानमधील 79 हजार लोक उपासमारीच्या पाचव्या टप्प्यात पोहोचण्याची भीती आहे.

या लोकांना पुढील काही दिवसांत भीषण दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. उपासमारीच्या संख्येत मागील आठ वर्षांच्या काळातील ही सर्वाधिक वाढ आहे. उपासमारीच्या संकटाचा सामना करत असलेल्या लोकांपैकी 80 टक्के लोक एकट्या गाझा परिसरातील आहे. इस्त्रायल हमास युद्धाचा सर्वाधिक फटका याच भागाला बसला आहे. इस्त्रायलच्या रोजच्या हल्ल्यांनी हा परिसर पूर्ण उद्धवस्त झाला आहे. या भागात भूकेचं संकट अत्यंत गंभीर अवस्थेत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube