प्लास्टिकमध्ये जेवण करताय? सावध व्हा, शरीराला ‘या’ गंभीर आजारांचा धोका..

Disadvantages Eating Food in Plastic : आजच्या काळात आपल्या जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. तसेच खाण्यापिण्याच्या सवयी सुद्धा बदलल्या आहेत. आधी घरचेच जेवण होते पण आज बाहेरचे खाद्यपदार्थ जास्त पसंत केले जात आहेत. पार्सल सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर करता येत आहेत. यामुळे अगदी काही वेळात गरमागरम खाद्यपदार्थ घरपोहोच मिळत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही ऑनलाईन किंवा पार्सल ज्या प्लास्टिकच्या डब्यात घेऊन येता ते तुमच्या आरोग्यासाठी किती (Health) नुकसानदायक आहे. प्लास्टिकच्या डब्यात पॅकबंद फूड अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देत आहे.
आजकाल प्रत्येक घरात प्लास्टिकच्या वस्तू सर्रास वापरल्या जात आहेत. स्वयंपाकघरात तर प्लास्टिकच्या वस्तूंची गर्दी झाली आहे. चहाचा घोट घेण्यापासून अगदी जेवणापर्यंत प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर केला जात आहे. इतकेच नाही तर बाजारात मिळणारे अनेक खाद्यपदार्थ याच प्लास्टिकच्या भांड्यात पॅक होऊन येत आहेत. बाहेर गेल्यानंतर लोक आता प्लास्टिकच्या भांड्यात खाणे पसंत करत आहेत. लोकांना या गोष्टीचे काहीच वाटत नाही. पण प्लास्टिकच्या भांड्यात खाद्यपदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. प्लास्टिक हळूहळू शरीराला अपायकारक ठरू लागले आहे. प्लास्टिकच्या भांड्यात खाल्ल्याने काय नुकसान होऊ शकते याची माहिती घेऊ या..
प्लास्टिकद्वारे घातक केमिकल्सचा फैलाव
प्लास्टिकमध्ये अनेक प्रकारचे घातक रसायने असतात. यामध्ये बिस्फेनॉल ए आणि फथेलेट्स यांसारखे केमिकल असतात. ज्यावेळी तुम्ही गरम खाद्यपदार्थ प्लास्टिकच्या भांड्यात टाकता तेव्हा हे केमिकल खाद्य पदार्थात मिसळले जातात. नंतर शरीरात गेल्यानंतर हार्मोनल असंतुलन करू शकतात. हृदयाशी संबंधित आजार, कॅन्सर, लठ्ठपणा, मधुमेह यांसारख्या आजारांचा शिरकाव होण्याची शक्यता असते.
विमा पॉलिसीचं टेन्शन विसरा! कागदपत्र अन् क्लेम प्रोसेस सगळचं सोपं; जाणून घ्या E Insurance काय?
कंजेस्टीव हार्ट फेल्युअरचा धोका
हृदयरोग तज्ञ डॉ. आनंद पांडे सांगतात प्लास्टिक कंटेनरमध्ये खाणे आरोग्यास अतिशय हानिकारक आहे. आज बाजारात प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या डब्यात जेवण करणे सहज सोपे झाले आहे. प्लास्टिकच्या डब्यात पॅक होणारे खाद्य पदार्थ खाल्ल्याने हार्ट फेल्युअर होण्याचा धोका वाढतो. शरीराच्या गरजेनुसार रक्त पंप करणे हृदयाला शक्य होत नाही तेव्हा ही स्थिती निर्माण होते. या स्थितीत हृदयाचे पंप खराब होतात. या बरोबरच शरीराच्या दुसऱ्या भागात रक्त जमा होऊ शकते. बहुतांश रक्त फुफ्फुस, पायात जमा होऊ लागते. यामुळे हार्ट फेल्युअरचा धोका वाढू शकतो.
कॅन्सरचा धोका वाढतो
प्लास्टिकच्या डब्यातील पॅकबंद भोजन कॅन्सरसारख्या आजाराला आमंत्रण देणारे ठरू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की प्लास्टिकमधील काही केमिकल दीर्घ काळ शरीरात जमा होत राहतात. आणि हळूहळू कॅन्सर सारख्या आजाराचे कारण बनू शकतात. विशेष करून प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये गरम खाद्य पदार्थ आणल्याने हा धोका जास्त वाढतो.
हुंडा, शिक्षण नव्हे तर, खराब CIBIL ने मोडलं लग्न; अकोल्यातील मोडलेल्या लग्नाची तुफान चर्चा!
हार्मोन्सवर विपरीत परिणाम
प्लास्टिकमधील विषारी तत्व शरीरातील हार्मोन्स बिघडवू शकतात. याचा परिणाम पुरुष आणि महिला दोघांवरही होतो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. जर तुम्ही रोज प्लास्टिकच्या भांड्यात जेवण करत असतात तेव्हा हळूहळू प्लास्टिकचे कण शरीरात जमा होऊ लागतात. यामुळे गॅस, ॲसिडिटी, पोटदुखी अशा समस्या निर्माण होतात.