अहिंदी भाषिक राज्यातील विद्यार्थ्यांसाठी हिंदी शिष्यवृत्ती नेमकी आहे तरी काय?

अहिंदी भाषिक राज्यातील विद्यार्थ्यांसाठी हिंदी शिष्यवृत्ती नेमकी आहे तरी काय?

Government Schemes : अहिंदी राज्यातील विद्यार्थ्यांना (Students)हिंदी भाषेचे ज्ञान व्हावे या उद्देशाने शालांत परीक्षेनंतर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी भारत सरकारकडून (Government of India)1984-85 या शैक्षणिक वर्षापासून ही शिष्यवृत्ती(scholarship) मंजूर केली जाते. शासनाने एकूण 255 संच निर्धारित सर्व अहिंदी भाषिक विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.

भाजपविरोधात युवक कॉंग्रेसचा मोर्चो पोलिसांनी अडवला, कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

*योजनेसाठी प्रमुख अटी* :
▪ शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची मर्यादा नाही.
▪ मागील वार्षिक परीक्षेत किमान 60 टक्के गुण आवश्यक.
▪ विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे :
– माध्यमिक शालांत परीक्षा व उच्च माध्यमीक परीक्षा उत्तीर्ण असलेबाबतचे प्रमाणपत्र.
– बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
– नुतनीकरणासाठी मागील वर्षाची पास झाल्याची गुणपत्रिका.

लाभाचे स्वरूप असे :
▪ 11 वी 12 वी प्रतिवर्ष – 3000/-
▪ पदवीसाठी प्रतिवर्ष – 5000/-
▪ पदव्युत्तर पदवी – प्रतिवर्ष 10,000/-

सदर रक्कम ही भारतीय स्टेट बँक ॲाफ इंडिया पुणे कोषागार शाखा, पुणे यांचेकडून विद्यार्थ्यांचे बँक खात्यावर थेट (NFT) जमा करण्यात येते.

या ठिकाणी संपर्क साधावा : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन,.. पुणे -411 001.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज