ठाकरे-पवार सोनियाजींच्या भीतीमुळं प्राणप्रतिष्ठेला आले नाहीत; अमित शाहांचा टोला

ठाकरे-पवार सोनियाजींच्या भीतीमुळं प्राणप्रतिष्ठेला आले नाहीत; अमित शाहांचा टोला

 

Amit Shah Amravati Speech : अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघातील भाजपच्या (BJP) उमेदवार नवनीत राणांच्या (Navneet Rana) प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भव्य प्रचार सभा झाली. या सभेत बोलतांना शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे सोनिया गांधींच्या भीतीमुळं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत, अशी टीका शाह यांनी केली.

‘न्यायालयाचा पेपर फुटल्याचं पहिल्यांदाच पाहिलं’; कडुंनी राणांना जात प्रमाणपत्राच्या निकालावरुनही सोडलं नाही 

शाह यांची अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या सभेला संबोधित करतांना शाह म्हणाले, नवनीत राणांना पुन्हा खासदार बनवणं म्हणजे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं आहे. राणांच्या नावासमोर कमळाचं चिन्ह आहे. त्या कमळाच्या चिन्हाला मत देणं म्हणजे मोदींना मत देणं, मोदींना पंतप्रधान करणं आहे. तुमचं एक एक मत आतंकवाद, नक्षलवादापासून देशाला मुक्त करण्यासाठी जात आहे. भाजपला मत देणं म्हणजे, देशप्रेमींना मत देणं. रमराज्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना मत देणं आहे, असं शाह म्हणाले.

कायद्याचा श्वास रोखाल तर आमच्यात हात तोडण्याचं सामर्थ्य; बच्चू कडुंनी थेट धमकावलंच 

10 वर्षात मोदींना देशाच्या विकासाठी अनेक कामं केली. त्यातील काही कामं मोदींशिवाय कोणी करूच शकलं नसतं. अयोध्येतील राम मंदिराचं काम मोदींना केलं. कॉंग्रेस 70 वर्षात राममंदिर करू शकलं नाही. त्यांनी राम मंदिर कायद्याच्या कचाट्यात अडकून ठेवलं. मात्र, मोदींना भूमिपूजन केलं आणि प्राणप्रतिष्टाही केली, असं शाह म्हणाले.

नकली शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण दिलं. मात्र, सोनिया गांधींच्या भीतीने ते प्राणप्रतिष्ठेला आले नाही. शरद पवारांनाही निमंत्रण दिलं, त्यांनी तब्येतीचं कारण पुढं दिलं. विरोधकांना प्रभू श्रीरामाचा अपमान करण्याचं काम केलं, असं शाह म्हणाले.

पवारांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची माफी मागावी…
मी नवनीत राणांना सपोर्ट केला होता, असं पवार सांगतात. त्यांनी राणांना मदत केल्यानं अमरावतीकरांची माफी मागितली. शरद पवार कृषीमंत्री असतांना विदर्भात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पवार साहेब, तुम्ही विदर्भातील शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. सिंचनासाठी काही केलं नाही. माफी मागायची असेल तर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची माफी मागा, असा टोलाही शाह यांनी लगावला.

शाह म्हणाले, मोदींना केवळ राम मंदिरच नाही, तर औरंगजेबाने तोडलेलं काशी विश्वनाथ कॉरिडॉर बनवल, असं शाह म्हणाले. मोदींनी कलम कलम 370 हटवलं. मात्र, कॉंग्रेसने त्याला विरोध केला होता. 70 वर्ष कॉंग्रेस कलम 370 ला बेवारस मुलासारखं सांभाळत राहिलं. मोदींना हे कलम हटवलं.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube