कोविडमध्ये ठाकरेंचे सहकारी मलाई खायचे अन्..,; खिचडी घोटाळ्यावरुन अमित शाहांनी घेरलं

कोविडमध्ये ठाकरेंचे सहकारी मलाई खायचे अन्..,; खिचडी घोटाळ्यावरुन अमित शाहांनी घेरलं

Amit Shah On Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) कोरोना काळात 130 कोटी नागरिकांना मोफत लस देऊन सुरक्षित केलं. त्या काळात उद्धव ठाकरेंच (Uddhav Thackeray) सकारी खिचडी घोटाळा करून मलाई खात होते, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शा (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

विमाननगर येथे इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला भीषण आग… 

जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचाचार्थ आज अमित शाह यांची जालन्यात सभा झाली. त्यावेळी बोलतांना शाह म्हणाले की, मोदींनी दहशतवाद आणि नक्षलवाद संपवून टाकला. इंदिरा गांधी म्हणून गेल्या की गरिबी हटाव मात्र देशातील गरीबी कॉंग्रेसने कमी केली नाही. मोदींनी मात्र, ८० करोड गरिबांच्या घरी राशन पाठवलं. मोदींनी कोरोना काळात 130 कोटी नागरिकांना मोफत लस देऊन सुरक्षित केलं. त्या काळात उद्धव ठाकरेंचे सकारी खिचडी घोटाळा करून मलाई खात होते, अशा शब्दात अमित शाह यांनी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

सॅम पित्रोदांनी दिला इंडियन ओव्हरजीज कॉंग्रेसचा राजीनामा; जयराम रमेश यांची माहिती 

पुढं बोलतांना शाह म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर दिले होते. पण या निर्णयाला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्या पायाशी उद्धव ठाकरे काय करत आहेत? असा सवाल अमित शहा यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, माझ्या सभेनंतर अवघ्या दोन दिवसांनी उद्धव ठाकरेही जालन्यात सभा घेणार आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरेंना हा प्रश्न विचारा, असं आवाहन शाह यांनी केलं.

शाह म्हणाले, उद्धव ठाकरेंनी सांगावं की, अयोध्येत राम मंदिर झालं ते चांगलं झालं. पण ते सांगणार नाहीत. कारण, तुम्ही त्यांची व्होट बॅंक नाही आहात. त्यांची व्होट बॅंक ही कॉंग्रेसची व्होट बॅंक आहे, असंही शाह म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube