‘भटकती आत्मा’ नेमकं कोण? पुढच्या सभेत मोदींना विचारणार; अजितदादांची सावध प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'भटकती आत्मा' कोणाला म्हटलं हे पुढच्या सभेत विचारणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Ajit Pawar Narendra Modi Sharad Pawar

Ajit Pawar News : लोकसभेचं वातावरण पेटलेलं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी पुण्यात येऊन शरद पवार (Sharad Pawar) यांना ‘भटकती आत्मा’ म्हटलं आहे. त्यावरुन आता चांगलंच रणकंदन सुरु झालं आहे. अशातच मोदींच्या या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सावध प्रतिक्रिया दिलीयं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भटकती आत्मा कोणाला म्हटलं हे पुढच्या सभेत विचारणार असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं आहे.

भटकती आत्मा! ‘माझं बोट धरुनच राजकारणात आलेत..,’, पवारांनी मोदींची सुरुवातच काढली

अजित पवार म्हणाले की, मी काही ज्योतिषी नाही. नरेंद्र मोदींनी भटकती आत्मा कुणाला म्हटलं हे माहिती नाही. पण पुढच्या वेळच्या सभेला ते भेटतील त्यावेळी त्यांनी भटकती आत्मा कुणाला म्हटलं हे त्यांना विचारणार आहे, त्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे तो विचारणार असल्याचं अजितदादांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

रामदेव बाबांना झटका! ‘पतंजली’च्या 14 प्रकारच्या उत्पादनांवर बंदी, भाजपशासित सरकारचा निर्णय

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना काल राज्यातील विविध मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा पार पडल्या. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर मोदींची सभा पार पडली. या सभेत बोलताना मोदी म्हणाले, ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्यांची आत्मा भटकत असते, स्वत:चं काही झालं नाहीतर दुसऱ्यांचं बिघडवण्यात त्यांना अधिक चांगलं वाटतं. महाराष्ट्रही अशा भटकती आत्माचा शिकार झालेला आहे, काही वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्यांने स्वत:च्या महत्वाकांक्षेसाठी हा खेळ सुरु केला असल्याची जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. यावेळी बोलताना मोदींनी शरद पवार यांचा नावाचा उल्लेख करणं टाळलं आहे.

माझं बोट धरुनच राजकारणात आलेत अन् आज..,
मोदींचा सध्या माझ्यावर खूप राग असून त्यांनी याआधीच्या काळात भाषण केलं होतं की, मी शरद पवारांच्या बोटाला धरुनच राजकारणात आलो आहे. पण आता ते मला महाराष्ट्रात एक भटकती आत्मा असल्याचं बोलत आहेत. होयं माझा आत्मा अस्वस्थ आहे हे खरयं, पण स्वत:च्या स्वार्थासाठी नसून लोकांच्या दु:खासाठी, शेतकऱ्यांचे दु:ख पाहुन माझा आत्मा अस्वस्थ होत असेल तर त्यात गैर नाही. देशातली जनता सध्या महागाईने त्रस्त असून प्रपंच करणे अवघड झालं आहे, त्यामुळे जनतेसाठी मी 100 वेळा अस्वस्थ होणार असल्याचं शरद पवारांनी जाहीर सभेत सांगितलं आहे.

follow us