सांगलीसाठी ठाकरेंचं ‘मन’ परिवर्तन करणार काँग्रेसचा ‘हुकमी एक्का’; उत्तर मुंबईसाठीदेखील खास प्लॅन

  • Written By: Published:
सांगलीसाठी ठाकरेंचं ‘मन’ परिवर्तन करणार काँग्रेसचा ‘हुकमी एक्का’; उत्तर मुंबईसाठीदेखील खास प्लॅन

मुंबई : सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्ष या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. सांगलीत ठाकरेंकडून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर, काँग्रेसकडून या ठिकाणी विशाल पाटील (Vishal Patil) इच्छूक असून, आहेत. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तर, दुसरीकडे सांगलीत विजय मिळवण तुम्हाला कठीण असल्याचे सांगत काँग्रेसने ठाकरेंना नवी ऑफर दिली असून, ठाकरेंच्या मनपरिवर्तानासाठी काँग्रेसकडून हुकमी एक्का मैदानात उतरवण्यात आला आहे. (Congress New Offer For Sangali Loksabha Seat To Uddhav Thackeray)

Lok Sabha Election : .. तर ती माझी चूक आहे का? भर सभेत विशाल पाटलांच्या डोळ्यात अश्रू

काँग्रेसची ऑफर काय?

महाविकास आघाडीत एका जागेवरून निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी सांगलीची जागा काँग्रेसला देऊन काँग्रेसच्या वाट्याला आलेली मुंबई उत्तरची जागा ठाकरे गटाली घ्यावी अशी ऑफर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून ठाकरेंना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

ठाकरेंसोबत चर्चेची जबाबदारी चव्हाणांकडे

एकीकडे सांगलीच्या बदल्यात मुंबई उत्तरच्या जागेची ऑफर ठाकरेंना देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे सांगलीचा तिढा सोडणवण्याची जबाबदारी आणि ठाकरेंसोबत चर्चेसाठी काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.

छ.संभाजीनगरात CM शिंदे भाजपची चाल खेळणार; वाढदिवसाच्या शुभेच्छांमागून उमेदवाराची चाचपणी

बदल का आवश्यक काँग्रेसकडून फुल्ल प्रुफ प्लान तयार

सांगलीच्या जागेसाठी 19 एप्रिल हा दिवस अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या आधी काँग्रेसकडून ठाकरे गटाला अदलाबदलीची ऑफर देण्यात आली आहे. ही ऑफर देताना काँग्रेसकडून फुल्ल प्रुफ प्लॅनिंग करण्यात आले असून, सांगलीतील लढत उद्धव ठाकरेंसाठी सोपी नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर, काँग्रेसकडे मुंबई उत्तरसाठी तगडा उमेदवार नाहीये. त्यामुळे देन्हीकडे पराभव होऊन काँग्रेस आणि ठाकरे गटाला फटका बसू शकतो अशी भीती काँग्रेसने व्यक्त केली आहे.

… ठाकरेंनी प्रस्ताव नाकारल्यास उत्तर मुंबईत कोण?

सांगली काँग्रेसकडेच राहावी यासाठी वरिष्ठ नेत्यांपासून जोरदार प्रयत्न केले जात आहे. मात्र, अधिकचे प्रयत्न करूनही जर ठाकरेंनी सांगलीचा उमेदवार बदलण्यास नकार दिला तर पुढे काय असा प्रश्न काँग्रेससमोर आहे. त्यामुळे उत्तर मुंबईसाठी काँग्रेसकडून प्लॅन बी तयार करून ठेवण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई उत्तर मधून विनोद घोसाळकर किंवा त्यांच्या सून तेजस्वी घोसाळकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा त्याबदल्यात त्यांना मुंबई उत्तरची उमेदवारी देण्याची तयारी काँग्रेसने केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा नवा प्रस्ताव उद्धव ठाकरे स्वीकारतात का? की सांगलीच्या जागेवर ठाम राहतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज