मुंबईच्या सभेपूर्वी वातावरण तापलं; सुपारी शॉप्स इन पॉलिटिक्स म्हणत राऊतांनी राज ठाकरेंना ललकारलं

  • Written By: Published:
मुंबईच्या सभेपूर्वी वातावरण तापलं; सुपारी शॉप्स इन पॉलिटिक्स म्हणत राऊतांनी राज ठाकरेंना ललकारलं

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील काही पॉलिटिकल सुपारी शॉप्सची दुकाने बंद होणार असून, यातील एक दुकान राज ठाकरेंचं (Raj Thackeray) आहे असे म्हणत उद्वव ठाकरेंचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंना ललकारले आहे. राऊतांच्या या विधानानंतर आता उबाठा आणि मनसैनिकांमध्ये शाब्दीक वाद होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे ज्यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित करतात त्यांच्याबरोबरच जातात ही राज ठाकरे यांची खासियत असल्याचेही राऊतांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sanjay Raut Criticizes Raj Thackeray Before Public Rally In Mumbai Today )

लोकसभेत बहुमत मिळालं नाही तर प्लॅन B काय?, अमित शाहांनी सगळं फोडूनच सांगितलं

राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात कोणीही येऊ दे, जितक्या सभा घेतील तितक्या त्यांच्या सीट कमी होतील अशी टीका राऊतांनी मोदींवर केली. मोदी मुंबईत येऊन इतक्या सभा घेतात याचा अर्थ स्पष्ट आहे की, भाजप सरकारने आणि मोदींनी गेल्या दहा वर्षात काही केलं नाही. त्यामुळे ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या, त्यांना मांडीवर घेऊन बसावे लागले नसते असेही राऊत म्हणाले.

तुम्ही तर रक्ताचे होतात ना? तरीही बाळासाहेबांसोबत असं का केलं?, भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार

…म्हणून सुपारीबाज बोलावण्यात आले

आज मुंबईत मोदी आणि मविआच्या नेत्यांच्या महासभा आहेत. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, आज (दि.17) संध्याकाळी महाविकास आघाडीची सभा आहे. शिवतीर्थावर मविआची सभा व्हावी यासाठी आम्ही प्रथम अर्ज केला होता. मात्र, आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्री आणि सुपारीबाज बोलवण्यात आले, हा सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचं स्थान काय? टीकेवर उत्तर देत पवारांचा खोचक सवाल

भाजपच्या मांडीला मांडी लावूम आज राज ठाकरे मुंबईत सभेला बसणार आहेत. ते स्वतःला  महाराष्ट्राचे  स्वाभिमानी म्हणतात आणि त्यासाठीच मनसे पक्ष स्थापने केल्याचेही राज ठाकरे जाहीरपणे सांगतात. तेच राज ठाकरे आज महाराष्ट्राच्या  शत्रूंबरोबर एकाच व्यासपीठावर बसून त्यांच्याबद्दल कौतुकाची फुले उधळणार असून, हे चित्र अवघा महाराष्ट्र यादी देही याची डोळा दिसणार आहे. राज ठाकरेंची एक खासियत आहे ज्यांच्यावर ते प्रश्न उपस्थित करतात त्यांच्याबरोबरच ते जातात. मात्र, राज ठाकरेंचं सुपारीचे दुकान पूर्णपणे बंद होणार असून, जनताच हे दुकान बंद करेल असेही राऊत म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube