राज्य सरकारचा मोठा निर्णय, पोलिस कुटुंबियांच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती गठित

राज्य सरकारचा मोठा निर्णय, पोलिस कुटुंबियांच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती गठित

Maharashtra Government : गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना (Police) येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांकडून राज्य सरकारकडे (Maharashtra Government) मागणी करण्यात येत होती. पोलीसांच्या कुटुंबियांकडून होणाऱ्या या मागणीचा विचार करून आणि अडचणींवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार आता पोलिसांना येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने ही समिती गठीत केली आहे. ही समिती पोलीसांच्या कुटुंबियांच्या अडचणींसंदर्भात जसे की, कौशल्य कार्यक्रमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, निवासस्थाने, आरोग्य इत्यादी समस्यांबाबत विचारविनिमय करुन त्याचे निराकरण करण्यासाठी सरकारला उपाययोजना सुचवणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

या समितीमध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यासह पोलीस महासंचालक यांचा देखील समावेश राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.

समितीमधील सदस्य खालीलप्रमाणे

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, अध्यक्ष

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सदस्य

कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रसाद लोढा, सदस्य

विधानसभा आमदार कालिदास कोळंबकर, सदस्य

विधानसभा आमदार राम कदम, सदस्य

विधान परिषद आमदार परिणय फु के, सदस्य

विधानसभा आमदार सिद्धार्थ शिरोळे, सदस्य

अपर मुख्य सचिव, गृह, गृह विभाग, मंत्रालय, सदस्य

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, सदस्य

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, सदस्य

उपाध्यक्ष-नि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस, सदस्य

गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्या. मुंबई, सदस्य

उद्या भारताला मिळणार 2 पदके, हॉकीत बेल्जियमशी भिडत, पहा 1 ऑगस्टचे संपूर्ण वेळापत्रक

राहुल अर्जुनराव दुबाले, सदस्य

मोठी बातमी! उद्यापासून फास्टॅगच्या नियमांमध्ये होणार बदल, आजच पूर्ण करा ‘ही’ प्रक्रिया नाहीतर…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube