राष्ट्रवादीतील मुन्नी कोण? धसांचं नाव घेत प्रश्न विचारताच अजितदादा भडकले
Ajit Pawar Reaction On Suresh Dhas Statement : राज्यात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडत आहेत. नुकतेच सुरेश धस (Suresh Dhas) यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधलाय. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) प्रतिक्रिया समोर आलीय. सरकार पोलिसांना इतक्या चांगल्या सुविधा देत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण व्हावा? शहराच्या पोलीस प्रमुखाचे हे अपयश आहे. तुम्हाला जमत नसेल तर तसं (Santosh Deshmukh Murder Case) सांगा. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
ब्रेकिंग! उद्धव ठाकरेंना मोठा झटका, राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणाची याचिका हायकोर्टाने फेटाळली
बीड प्रकरणाची वेगवेगळ्या यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. कोण कुणाशी, कुठल्या पक्षाशी संबंधित आहे. याचा विचार केला जाणार नाही असं मुख्यमंत्री म्हणालेत. जो दोषी असेल त्यांना पाठीशी घालणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करू. सुरेश धस यांनी पुरावे द्यावेत. आरोप करताना विचार करावा. आम्ही या प्रकरणात राजकारण आणणार नाही. कुणाला पाठीशी घालणार नाही. सुरेश धस यांचं नाव घेत प्रश्न विचारताच अजितदादा भडकल्याचं दिसतंय.
बडी मुन्नी कोण ते त्यांना (सुरेश धस) विचारा. असल्या फालतू गोष्टींवर मी बोलणार नाही. इथून पुढे मी नाव घेऊन बोलेन, असं देखील अजित पवार म्हणालेत. त्यानंतर पालकमंत्री पदावर बोलताना अजित पवार म्हणाले की, पालकमंत्री कुणाला करायचं? हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. माझा पक्ष, त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांचा निर्णय ते घेतील. त्यांच्या खासदारांशी कोणीही संपर्क साधलेला नाही. साखर कारखान्यासंबंधी प्रश्नाबाबत अमित शहा यांना भेटलो.
त्यानंतर छगन भुजबळ यांच्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, छगन भुजबळ हा आमचा पक्षांतर्गत विषय आहे. आम्ही त्यावर मार्ग काढू. पुण्यात कायदा सुव्यवस्था परिस्थिती सुधारली नाही तर माणूस बदलायला लागेल, असं मी पोलीस आयुक्तांना सांगणार आहे. दोन्ही पवार एकत्र येणार का? असा प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले की, याला काही उत्तर देणार नाही. आमचं आम्ही पाहून घेऊ.
मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ॲक्शन मोडवर राहायलाच लागते. त्यांचे कौतुक होत असेल तर चांगलंच आहे. पण इतर मंत्री काम करत नाहीत, असं कोणी म्हणत असेल तर त्यांच्याकडे काही मुद्दे नाहीत. उगाचच टीका करतात. मी सुरेश धस यांच्या बाबतीत बावनकुळे आणि मुख्यमंत्र्यांना जे सांगायचे, ते सांगितले आहे. काय तो योग्य निर्णय घेतील असं देखील अजित पवार म्हणाले आहेत.