अजित पवार गटाच्या आमदारांत एकमत नाही? भुजबळांची नाराजी जाहीर, वळसे पाटलांचा वेगळाच सूर

अजित पवार गटाच्या आमदारांत एकमत नाही? भुजबळांची नाराजी जाहीर, वळसे पाटलांचा वेगळाच सूर

Dilip Walse Patil Statment On Maharashtra Cabinet Minister Post : राज्यात अखेर 15 डिसेंबर रोजी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला. यामध्ये शिंदे सेनेच्या 11 मंत्र्यांना, अजित पवार पक्षाच्या 9 तर भाजपच्या 19 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंजळ विस्तारामध्ये तिन्ही पक्षातील अनेक बड्या नेत्यांना मात्र या यादीतून वगळण्यात आलंय. यामुळे महायुतीचे अनेक नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि दिलीप वळसे पाटील हे (Dilip Walse Patil) नाराज असल्याचं समोर आलंय. यावर आता वळसे पाटलांची प्रतिक्रिया समोर आलीय.

दरम्यान अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये एकमत (Maharashtra Politics) नाही. महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांना देखील मंत्रिमंडळातून वगळण्यात आलंय. छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी स्पष्ट केलीय. तर दिलीप वळसे पाटलांनी मात्र वेगळाच सूर घेतल्याचा दिसत आहेत.

नितेश राणे ते नरहरी झिरवाळ.. चर्चेतल्या पाच मंत्र्यांना वजनदार खाती, जाणून घ्या..

तुम्हाला मंत्रिपद मिळायला पाहिजे, अशी मागणी दिलीप वळसे पाटील यांच्या एका कार्यकर्त्याने केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, पंधराशे मतांनी जिंकून आलोय अन् मंत्रिपद मागू का? महायुतीचे अनेक (Maharashtra Cabinet Minister Post) आमदार राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान नाही मिळाले म्हणून नाराज आहेत. अनेकजणांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे तर, अनेकांनी अधिवेशन सोडत कृतीमधून नाराज असल्याचं दाखवून दिलंय.

मी 500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?, वळसे पाटलांचा टोमणा

छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे, तर वळसे पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दिलीप वळसे पाटील म्हणाले की, पक्षावर नाराजी नाही. विधानसभेला अवघ्या 1500 मतांनी विजयी झालोय. 1500 मतांनी विजयी झाल्यानंतर मंत्री करा अशी मागणी करू का? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. पक्षावर नाराजी नसून पक्षाने घेतलेला निर्णय मान्य आहे. माझी काय चूक झाली? असा सवाल देखील दिलीप वळसे पाटलांनी केलाय.

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बदल हवा, असा प्रचार करण्यात आला होता. तोच बदल करण्यासाठी काही लोकांनी पावलं टाकली असल्याचं देखील दिलीप वळसे पाटलांनी म्हटलंय. दिलीप वळसे पाटील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा आदर आम्हाला असल्याचं देखील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube