सर्वसामान्यांच्या स्वप्नांना धक्का; घरे महागणार, राज्यात रेडीरेकनर दरांत वाढ, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक?

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना धक्का; घरे महागणार, राज्यात रेडीरेकनर दरांत वाढ, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक?

Maharashtra News : आर्थिक वर्ष आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. घर खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरची गोष्ट असते. त्यामुळे कर्ज काढून घर खरेदी केली जाते. परंतु, आता घरांच्या किंमती वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण राज्य सरकारने चालू बाजारमूल्य दरांत (रेडीरेकनर) घसघशीत वाढ केली आहे. मुंबईत 3.39 टक्के, ठाण्यात 7.72 टक्के तसेच राज्यात सरासरी 4.39 टक्के दरवाढ करण्यात आली आहे.

रेडीरेकनर दरांत वाढ झाल्याने आता मालमत्तांचे दर वाढणार आहेत. मालमत्ता खरेदीदारांवर त्याचा जास्त भार पडणार आहे. 31 मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षात 56 हजार कोटींहून अधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे. रेडीरेकनरच्या दरात 1 एप्रिलपासून वाढ होणार असल्याची कुणकूण लागताच मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दस्त नोंदणीसाठी कार्यालयांत मोठी गर्दी झाली होती.

मुंबईत घर नको रे बाबा! जगातलं तिसरं महागडं शहर; यादीत टॉप 5 मध्ये दिल्लीचाही नंबर

राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक विभागाने 2025-26 या कालावधीसाठी रेडीरेकनरच्या दरात वाढ केली आहे. या नव्या दरवाढीनुसार मिरा भाईंदरमध्ये 6.26 टक्के, कल्याण डोंबिवलीत 5.84 टक्के, नवी मुंबईत 6.75 टक्के वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मोठ्या शहरांत घरांच्या किंमती वाढणार आहेत. आधीच या शहरांत घर खरेदी करणे म्हणजे अतिशय कठीण गोष्ट होती. आता पुन्हा रेडीरेकनरची दरवाढ झाली आहे. परिणामी घरे आणखी महागणार आहेत.

नव्या दरवाढीनुसार नाशिकमध्ये 7.31 टक्के, सोलापूर 10.17 टक्के, उल्हासनगर 9 टक्के, वसई-विरार 4.50 टक्के, पनवेल 4.97 टक्के, पुणे 4.16 टक्के, भिवंडी 2.50 टक्के, पिंपरी चिंचवड 6.69 टक्के, सांगली 5.70 टक्के, कोल्हापूर 5.01 टक्के, इचलकरंजी 4.46 टक्के, अहिल्यानगर 5.41 टक्के, जळगाव 5.81 टक्के, धुळे 5.07 टक्के, छत्रपती संभाजीनगर 3.53 टक्के, लातूर 4.01 टक्के, परभणी 3.71 टक्के, जालना 4.01 टक्के, नागपूर 4.23 टक्के, नागपूर एनएमआरडीए 6.60 टक्के, चंद्रपूर 2.20 टक्के, चंद्रपूर म्हाडा 7.30 टक्के अशी दरवाढ झाली आहे.

घरासाठी अर्ज भरला अन् 50 हजारांना फसला; म्हाडाची फेक वेबसाईट समोर

अशी झाली दरवाढ..

महापालिका क्षेत्र 5.95 टक्के
राज्याची सरासरी वाढ 4.39 टक्के
मुंबई मनपा क्षेत्र 3.39 टक्के
संपूर्ण राज्याची एकूण वाढ 3.89 टक्के
ग्रामीण क्षेत्र 3.36 टक्के
प्रभाव क्षेत्र 3.29 टक्के
नगरपरिषद/पंचायत क्षेत्र 4.97 टक्के

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube