पाच वर्षात कोणते प्रश्न सुटले? कामांची यादी वाचत योगेश कदमांनी पुढचं व्हिजनही सांगितलं…
MLA Yogesh Kadam : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. खेड दापोली मतदारसंघाचे (Khed Dapoli) विद्यमान आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam)यांनी विकासकामावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत आपण पाच वर्षात कोणते प्रश्न सोडवले याची यादीच वाचून दाखवली.
… तेव्हा वर्षा बंगल्यावर एंट्री नव्हती, योगेश कदमांचा ठाकरेंबद्दल मोठा खुलासा
आमदार योगेश कदम यांनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी आपण पाच वर्षात कोणते प्रश्न सोडवले? असा सवाल केला असता ते म्हणाले, गेल्या पाच वर्षात मी मतदारसंघात अनेक कामं केली. मतदारसंघाच्या विकासासाठी मोठा निधी राज्य सरकाकडून आणला. त्या विकासनिधीतून या मतदारसंघात मोठी विकासकामे झाली. काही विकासकामे सुरु आहेत. या पाच वर्षात प्रामुख्यांने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला. हरणे बंदर विकसित करण्यासाठी मोठा निधी राज्य सरकारकडून आणला. दापोली तालुक्यातील हॉस्पिटल 50 बेडचे होते, त्या हॉस्पिटलाला 20 कोटींचा निधी उपल्ध करून दिला, आता दोपाली हॉस्पिटल 100 बेडचे झाले आहे, असं ते म्हणाले.
योगेश कदम डोक्यावर बर्फ ठेवून करेक्ट कार्यक्रम करणार ; दापोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले
मतदारसंघातील पोलीस वसाहतीसाठी 42 कोटींचा निधी दिला. आंबडवे या बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळ गावासााठी विकासाचा आराखडा तयार केला. खेड तालुक्यातील मीनाताई ठाकरे नाट्यगृह गेले कित्येक वर्ष बंद पडलं होतं, त्या नाट्यगृहाला 11 कोटी निधी देऊन नाट्यगृह पुन्हा केलं, याशिवाय, गोवा किल्लाच्या संवर्धानसााठी 8 कोटींचा निधी दिला, अशी बरीच कामे मतदारसंघात केल्याचं कदम म्हणाले.
पुढं ते म्हणाले, मागच्या पाच वर्षात मतदारसंघातील मुलभूत प्रश्न सोडण्यावर भर दिला होता. तर आता पुढच्या पाच वर्षात मूलभूत प्रश्नांसोबतच एमआयडीसी, उद्योग, लघुउद्योग, सिंचन, रोजगार या संदर्भात काम करणार आहे. मतदारसंघात एमआयडीसी आणण्यासाठी गेल्या दोन-अडीच वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. पाटगावात एमआयडीसाठी 1000 एकर जागा निवडली. त्याला मुंजरी देखील मिळाली, असं कदम म्हणाले.
उद्धव ठाकरेंना सहानुभूती नाहीच…
लोकसभेपेक्षा विधानसभेला आमचा स्टाईक रेट चांगला असेल. लोकसभेला प्रतिकुल वातावरण असतांनाही आम्ही चांगली लढत दिली. आता फारशी प्रतिकुल परिस्थिती नाही, बंडखोरांचे आव्हान नाहीत, त्यामुळं विधानसभेला शिवसेनेला 60 ते 65 जागा मिळतील, असा दावा करत उद्धव ठाकरेंना सहानुभूती दिसत नाही, शिवसैनिक शिंदे साहेबांसोबत आहेत, असं कदम म्हणाले.
दरम्यान, भाजप-शिवसेना धुसफुसीवरही कदम यांनी भाष्य केलं. भाजप- शिवसेनेते सध्या कोणतीही धुसफूस नाही. आमच्यातील वाद मिटले. रवींद्र चव्हाण आणि कदम कुटुंबातीत मतभेदही मिटले आहेत. आम्ही महायुतीचं एकत्र काम करतोय, असं योगेश कदम म्हणाले.