नांदेडच्या राजकारणात पुन्हा जुना संघर्ष; विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन बडे नेते एकमेकांच्या विरुद्ध लढणार?
Nanded Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण
Nanded Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. 17 जागांवर होणाऱ्या या निवडणुकीमुळे महायुतीमध्ये सध्या जागावाटपावरुन अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहे. जागा आपल्याकडे घेण्यासाठी नेत्यांकडून जोरदार लॉबिंग पाहायला मिळत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरी बंगल्यावर अनेक राजकीय घडामोडींना वेग आलं आहे.
माहितीनुसार, नांदेड विधानपरिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी देवगिरी बंगल्यावर गर्दी केली आहे. आमदार आणि माजी खासदार प्रतापराव चिखलीकर (Prataprao Chikhalikar) यांनी यासाठी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत या जागेबाबत सविस्तर चर्चा केली आहे. या भेटी दरम्यान नांदेड विधानपरिषदेची जागा (Nanded Legislative Council Seat) महायुतीत (Mahayuti) राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली पाहिजे अशी भूमिका चिखलीकारांनी घेतली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.
पुन्हा जुना संघर्ष पेटणार?
तर दुसरीकडे जर नांदेड विधानपरिषदेची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर पुन्हा एकदा नांदेडच्या राजकीय वर्तुळात अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि प्रतापराव चिखलीकर यांच्या राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकतो. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्ण बदलेली आहे. त्यामुळे ही जागा जर राष्ट्रवादीला सुटली तर पुन्हा एकदा नांदेडमध्ये चव्हाण आणि चिखलीकर गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
…तर भाजप अहिल्यानगरची जागा स्वबळावर जिंकेल; विधानपरिषेसाठी ‘या’ नावांची चर्चा
तर दुसरीकडे भाजपकडून या जागेसाठी अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक आणि माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा जिल्ह्यातील राजकारणात सुरु आहे मात्र आता ही जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी चिखलीकरांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष आता नांदेड जिल्ह्यातील राजकारणाकडे लागले आहे.