‘ठाकरे कुटुंब पळण्याच्या तयारीत, त्यांचे पासपोर्ट जप्त करा’; राणेंनी नेमकं काय सांगितलं?

‘ठाकरे कुटुंब पळण्याच्या तयारीत, त्यांचे पासपोर्ट जप्त करा’; राणेंनी नेमकं काय सांगितलं?

Nitesh Rane on Uddhav Thackeray : मी गृहविभागाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांचे पासपोर्ट जप्त करावेत. कारण, ४ जूनला त्यांचा पराभव होणार हे सिद्ध झालं आहेच. माझ्या माहितीनुसार हे कुटुंब आता लंडनला पळण्याच्या तयारीत आहे. अंगावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेच आता उद्धव ठाकरे कुटुंबियांसह लंडनला पळण्याच्या तयारीत आहे. म्हणून पोलीस खात्याने लवकरात लवकर लूक आऊट नोटीस काढावी त्याचबरोबर त्यांचे पासपोर्ट जप्त करावेत अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरेंचा चेहरा पाहिल्यानंतर पराभव म्हणजे नेमकं काय हे समजते. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद व संजय राऊतचं रडगाणं बघून पुन्हा मोदी येणार हे समजले आहे. ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावेत कारण 4 जूननंतर ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत आहे. महायुतीला राज्यातील जनतेनं मनापासून स्वीकारलं आहे. हे दिसून आलं आहे. आमचे उमेदवार घासून नाही ठासून विजयी होतील यात काहीच शंका नाही. राज्यात महायुती 45 चा आकडा गाठणार असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.

संजय राऊतांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यांनी ठाकरेंनाही ब्लॅकमेल केलं; नितेश राणेंचा पलटवार

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आलेल्या वादळात उद्धव ठाकरेंच्या सरकारने किती मदत केली. लोकांना आम्ही स्वतः मदत केली आहे. आमचं सरकार भरघोस मदत करणार आहे. 4 जूननंतर सगळे विरोधक हद्दपार झालेले दिसतील. ज्यांनी आयुष्यात एक निवडणूक लढविली नाही. मतदान कसे मिळवायचं हे माहीत नाही तो मतदानाची पद्धत शिकवत असेल तर लाजिरवाणी गोष्ट आहे असा टोला त्यांनी संजय राऊतांनी लगावला.

पुण्यात रविवारी झालेल्या अपघातावरही त्यांनी भाष्य केले. पुण्यातील दुर्घटनेबाबत पोलीस सतर्क आहेत. हे महाविकास आघाडीचं सरकार नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या पद्धतीने दिशा सालियान केसचे पुरावे नष्ट केले तसे पुण्यातील अपघाताच्या बाबतीत घडणार नाही, असेही भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

नितेश राणे ‘वेडा’ आमदार, पोलिसांनी दुर्लक्ष करावं; आंबेडकरांचा राणेंवर मार्मिक भाष्य…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube