स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी फेर प्रभाग रचना करा; निवडणूक आयोगाचे निर्देश

Maharashtra Local Body Elections : राज्यात तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) कार्यवाही सुरू केली आहे. आयोगाने या निवडणुकांच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा अशा सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Maharashtra Local Body Election) अधिसूचना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका लवकर घेण्यास सांगण्यात आले होते. राज्यात पाच वर्षापेक्षा अनेक प्रकरणात प्रशासक कार्यरत आहे.ओबीसी आरक्षणाबाबत २०२२ मध्ये सादर झालेल्या बांठीया आयोगाच्या अहवालाआधी जे प्रमाण होते, त्यानुसारच आरक्षण देण्यात यावे, असेही स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच..नव्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची नवी रणनीती
न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने कार्यवाहीस सुरूवात केली आहे. या निवडणुकांच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा असे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. निवडणुका घेण्यासाठी महापालिका, नगर परिषदा, नगर पंचायतींच्या प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश बुधवारी आयोगाने दिले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी झेडपी गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची रचना करण्याचेही आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला आता प्रभाग रचना आणि ग्रामीण भागात गट आणि गणांच्या फेर रचनेचे काम युद्धपातळीवर हातात घ्यावे लागणार आहे.
Big Breaking : चार महिन्यात पालिका निवडणुका घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे फडणवीस सरकारला आदेश
तब्बल चार वर्षांनंतर सुनावणी
कोरोना संकटामुळे मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. प्रशासकाद्वारे या सर्व महापालिकांचा कारभार चाललेला. याविरोधात डिसेंबर २०२१ मध्ये राहुल वाघ यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर तब्बल चार वर्षांनंतर न्या. सूर्य कांत आणि न्या. नाँगमेईकपम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत
महापालिका निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत: गेली साडेचार वर्ष महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरुवातीला कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आणि त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या अडकल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने येत्या चार महिन्यांत या निवडणुका घ्याव्यात अशा प्रकारचा निर्णय दिला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार ) या निर्णयाचे स्वागत करीत आहे. आता राज्य सरकारने तातडीने या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हालचाल करावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार लोक प्रतिनिधींच्या हातात द्यावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) राज्य प्रवक्ता अंकुश काकडे यांनी दिली होती.
अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पुणे शहराध्यक्ष कोण पठ्ठ्या होणार? ‘ही’ नावे आहेत चर्चेत…