शिर्डी लोकसभेचं गणित बदलणार?, दादा भुसेंची आणि माजी आमदार भानदास मुरकुटेंची बंद दाराआड चर्चा

शिर्डी लोकसभेचं गणित बदलणार?, दादा भुसेंची आणि माजी आमदार भानदास मुरकुटेंची बंद दाराआड चर्चा

Meeting Dada Bhuse and Bhandas Murkute: लोकसभेच्या रणसंग्रमात कोण कुठल्या पक्षात जाईल आणि कुणाला कोण पाठिंबा देईल याचा काही भारोसा नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर सर्वच नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नेत्यांचीही वारंवार समजूत घालावी लागते. तसंच, निवडणुकांचा काळ असला की, बंद दाराआड चेर्चेचा फड रंगलेला असतोच असतो. अशातच राज्याचे मंत्री (Dada Bhuse) दादा भुसे यांनी आज श्रीरामपूरचे माजी आमदार भानदास मुरकुटे (Bhandas Murkute) यांची अशोक कारखाना कार्यस्थळावर भेट घेत त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली आहे. यावेळी भुसे यांनी सदाशिव लोखंडे यांना मदत करावी, असं आवाहन मुरकुटे यांना केली आहे. (Shirdi Loksabha) त्यावर मुरकुटे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ, असं आश्वासन भुसे यांना दिल आहे.

 

बंद दाराआड चर्चा

याबाबत मुरकुटे बोलताना म्हणाले, काल (मंगळवारी) दुपारी राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी आपली अशोक कारखाना कार्यस्थळावर भेट घेवून लोकसभा निवडणुकीत खासदार सदाशिव लोखंडे यांना मदत करावी, अशी गळ घातली. मात्र, आपण आपल्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी एक दोन दिवसांत चर्चा करून आपला निर्णय तुम्हाला सांगू, असं भुसे यांना सांगितलं असल्याची माहितीही मुरकुटे यांची दिली. या भेटी प्रसंगी मंत्री भुसे यांच्या समवेत सचिव चौधरी व माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासह मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कारखाना कार्यस्थळ येथे संचालकांची बैठक सुरू होती. संचालकांशी थोडा संवाद साधल्यानंतर मंत्री भुसे यांनी मुरकुटे यांच्या समवेत त्यांच्या दालनात बंद दाराआड चर्चा केली. दरम्यान, भुसे यांनी मुरकुटे यांची भेट घेतल्याने श्रीरामपूर तालुक्यात चर्चेला उधाण आलं आहे.

 

मुरकुटे काय भूमिका घेणार?

शिर्डी लोकसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक नुकतीच झालेली आहे. या बैठकीत मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी करण्यात आलेल्या बूथ कमिटींचा आढावाही घेण्यात आला. महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख सुनील शिंदे यांनी मार्गदर्शन केलं. निवडणुकीत कोणताही गाफीलपणा खपवून घेतला जाणार नाही. ही संधी वारंवार मिळणार नाही. त्यामुळे निवडणुकीला सन्मानाने सामोरे जा असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरू असताना आता शिंदे गटाचे आमदार दादा भुसे यांनी मुरकुटे यांच भेट घेतल्याने शिर्डी मतदार मुरकुटे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

मतदारसंघाचा पूर्व इतिहास

कोपरगाव मतदारसंघातून परिसीमन आयोगानुसार (सीमांकन) 2008 मध्ये शिर्डी या नव्या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. त्या अगोदर (2004) पर्यंत या मतदारसंघावर (कोपरगाव) प्रामुख्यानं बाळासाहेब विखे पाटलांचं वर्चस्व राहिलेलं होत. बाळासाहेब विखे पाटील यांनी या मतदारसंघाचं लोकसभेमध्ये तब्बल 7 वेळा प्रतिनिधित्व केलं. त्यापैकी 6 वेळा ते काँग्रेसकडून आणि एक वेळा शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. पण 2008 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतरच्या पहिल्या म्हणजे 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं याठिकाणी भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा विजय झाला होता.

 

2019 निवडणुकीतील स्थिती काय होती ?

1) सदाशिव लोखंडे (शिवसेना) 4 लाख 86 हजार 820 (47 टक्के) विजयी
2) भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस) 3 लाख 66 हजार 625 (35 टक्के) पराभूत
3) संजय सूरदान (वंचित) 63 हजार 287 (6 टक्के) पराभूत

follow us
  • fb
  • instagram
  • youtube