..तर मी राजकारणातून संन्यास घेईन; श्रीकांत शिंदेंचा उल्लेख करत कदमांचे थेट उत्तर

..तर मी राजकारणातून संन्यास घेईन; श्रीकांत शिंदेंचा उल्लेख करत कदमांचे थेट उत्तर

Ramdas Kadam : लोकसभेच्या जागावाटपात भाजपकडून शिंदे गटाची कोंडी होत असल्याचा मेसेज आता गेला आहे. शिंदेंबरोबर जे 13 खासदार गेले होते. त्यांच्या जागा कायम राखण्यातही एकनाथ शिंदे यांची दमछाक होत आहे. आधीच चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. हिंगोली मतदारसंघात तर भाजप नेत्यांच्या विरोधामुळे उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढवली आहे. भाजपने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघावरही दावा सांगितला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना अजूनपर्यंत त्यांच्या मुलाची उमेदवारीही जाहीर करता आलेली नाही. या घडामोडींमुळे एकनाथ शिंदे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांच्याकडून शिंदेंवर जोरदार टीका केली जात आहे.

ज्या खासदारांच्या विरोधात मतदारसंघात विरोधी वातावरण होते त्या खासदारांच्या उमेदवाऱ्या जाहीर होऊनही नंतर रद्द कराव्या लागल्या. असाच प्रकार कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबतीत घडेल अशी खोचक टीका ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी केली होती. अशाच प्रकारचे वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनीही केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Ramdas Kadam : केसाने गळा कापू नका, अन्यथा… रामदास कदमांच्या वक्तव्याने महायुतीत ठिणगी

कदम म्हणाले, माझ्या मनात खासदार विनायक राऊत यांच्याबद्दल आदर आहे. मी त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की मी कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलो. त्यावेळी मला त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की जागावाटप आणि तिकीट वाटपात कोणतीही अडचण येणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या मुलाला तिकीट मिळण्यात कोणतीच अडचण येणार नाही. जर त्यांच्या मुलाला तिकीट मिळाले नाही तर मी राजकारणातून निवृत्त होईल, असे कदम म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube