मोठी बातमी! पक्षविरोधी कारवायांचा ठपका; ठाकरे गटातून माजी खासदाराची हकालपट्टी
Maharashtra Elections : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा (Maharashtra Elections) उडू लागला आहे. स्टार प्रचारकांच्या सभा आणि रॅलींनी प्रचारात रंग भरू लागला आहे. तर दुसरीकडे पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्या मंडळींना पक्षा बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ लागला आहे. आताच एक मोठी बातमी हाती आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची (Subhash Wankhede) पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना (उबाठा) मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे.
नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारीवरून ठाकरे गटात वाद सुरू आहेत. पक्षाने येथे संगीता पाटील डक यांना तिकीट दिलं आहे. मात्र पैसे घेऊन आयात केलेला उमेदवार दिला गेला असा आरोप माजी खासदार वानखेडे यांनी केला होता. त्यानंतर पक्षांतर्गत धुसफूस चांगलीच वाढली होती. निवडणुकीच्या काळात हा वाद परवडणार नाही याचा अंदाज पक्षनेतृत्वाला आला होता.
उद्धव ठाकरेंना धक्का! ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारती कामडींचा जय महाराष्ट्र
सुभाष वानखेडे यांच्या या आरोपांनंतर ठाकरे गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले होते. जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली होती. नांदेड जिल्हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र बबन थोरात नावाचा व्यक्ती नांदेड जिल्ह्यात आल्यानंतर त्याने पूर्ण शिवसेना विकून खाल्ली असा आरोप वानखेडे यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर जिल्ह्यातील कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. या गोष्टी लक्षात आल्यानंतर पक्षाने कारवाईस सुरूवात केली.
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत सुभाष वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीच्या काळातच ही मोठी कारवाई ठाकरे गटाने केली आहे. या कारवाईनंतर आता माजी खासदार वानखेडे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पालघरमध्ये ठाकरेंना धक्का
पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि लोकसभा निवडणुकीतील ठाकरे गटाकडून उमेदवारी केलेल्या भारती कामडी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) वर्षा निवासस्थानी भारती कामडी यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पालघरचे सहसंपर्क प्रमुख वैभव संखे आणि उपनेते जगदीश धोडी उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंना धक्का! ऐन निवडणुकीच्या तोंडावर पोहरादेवी महंतांचा जय महाराष्ट्र; नाराजीही उघड