विशाल पाटलांचं नाव येताच ठाकरे भर पत्रकार परिषेदत म्हणाले, “त्यांनी बंडखोरी केली..”

विशाल पाटलांचं नाव येताच ठाकरे भर पत्रकार परिषेदत म्हणाले, “त्यांनी बंडखोरी केली..”

Uddhav Thackeray on Vishal Patil : सांगलीत नक्की ठरलंय. काँग्रेस नेत्यांनी आटोकाट प्रयत्न केल्यानंतरही विशाल पाटलांनी मैदान सोडलं नाही. आता ते लिफाफा घेऊन मतदारांत जाणार आहेत. सांगली हा काँग्रेसचा गड. ठाकरे गटाची ताकद येथे नगण्य. तरीदेखील काँग्रेसच्या नाकावर टिच्चून हा मतदारसंघ ठाकरेंनी खेचला. उमेदवारही दिला. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी जागा परत मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. उद्धव ठाकरेंबरोबर अनेक बैठका घेतल्या. त्यांची मनधरणी केली, विनंती केली. सांगलीच्या बदल्यात उत्तर मुंबईचा प्रस्तावही दिला. पण, उद्धव ठाकरे कशालाच बधले नाहीत. तरीदेखील काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्याविरोधात कधीच जााहीर भाष्य केलं नाही. पण, नांदेडमध्ये वेगळाच प्रकार घडला. पत्रकार परिषदेत विशाल पाटलांचं नाव येताच “त्यांनी बंडखोरी केली काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करील” अशा शब्दांत ठाकरे कडाडलेच..

त्याचं असं झालं, महाविकास आघाडीने नांदेड लोकसभा मतदारसंघात वसंतराव चव्हाण यांना तिकीट दिलं आहे. वसंतरावांच्या प्रचारानिमित्त उद्धव ठाकरे नांदेडात आले होते. येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. राज्यातील सुरक्षा वाऱ्यावर आहे. गद्दार मात्र बंदोबस्तात फिरत आहेत. सूरत त्यांना सुरक्षित का वाटतेय असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

Uddhav Thackeray : सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करा; ठाकरेंनी कॉंग्रेसला ठणकावलं

यानंतर पत्रकारांनी विशाल पाटील यांच्याबाबत त्यांना प्रश्न विचारला. सांगलीत विशाल पाटलांची बंडखोरी आहे काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करेल, असे स्पष्ट करत ठाकरेंनी हा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात टोलवला. यापेक्षा उद्धव ठाकरे या मुद्द्यावर जास्त काही बोलले नाहीत. अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरावर बोलताना ठाकरे म्हणाले, अशोक  चव्हाणांनी काँग्रेसमध्ये अनेकांची वाट अडवली होती. ते पक्ष सोडून गेल्याने आता काँग्रेसला नवचैतन्य मिळालं आहे.

सांगलीच्या तख्यासाठी तीन पाटील मैदानात

सांगली लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यासाठी आज अर्ज मागे घेण्याची शेवटचा दिवस होता. विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरल्यापासून त्यांनी तो माघारी घ्यावा यासाठी अनेक वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केली होती. मात्र, त्यानंतरही या नेत्यांना विशाल पाटलांचे मन वळवण्यात अपयश आले. त्यानंतर आता आयोगाने विशाल पाटलांना निवडणूकासाठी चिन्हदेखील दिले आहे. त्यामुळे सांगली लोकसभेसाठी तख्यात आता भाजपचे संजयकाका पाटील, ठाकरेसेनेकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील या तीन पाटलांमध्ये कडवी लढत होणार असून, तिघांपैकी कोणते पाटील सांगलीचं मैदान मारणार याचं उत्तर 4 जूनला मिळणार आहे.

Sangli News : सांगलीच्या पैलवानाला ‘मातोश्रीचा’ आशीर्वाद मिळवून देणारा वस्ताद राष्ट्रवादीचा?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube