औरंगाबादः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील अर्ध्याहून आमदार हे भाजपमध्ये जातील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी आज सकाळीच केला होता. त्यानंतर आता भाजपकडून वेगळीच राजकीय खेळी केली जाणार असल्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या दाव्यावरून उघडकीस आले आहे. मराठवाड्यातील लोकसभेचे आठही उमेदवार भाजप चिन्हावर विजयी होतील, असा दावा सावे यांनी केलाय. भाजपने राज्यातील महत्त्वाच्या जागांवर […]
संभाजीनगर : वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन वाटप प्रकरणामुळे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आले. दरम्यान याच मुद्द्यावरून विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात हे प्रकरण सभागृहात मांडलं आणि सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. आता याप्रकरणावरून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सत्तारांवर हल्लाबोल केला आहे. अब्दुल सत्तार यांच्या बाबत फक्त वाशिम येथील प्रकरण समोर आले. मात्र इतर […]
औरंगाबाद : सर्वच नेते मलाच का टार्गेट करतात, असा सवाल राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना केला आहे. औरंगाबादेतील सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, मी आज सत्तेत आहे, मी कोणावर टीका-टीपणी करत नाही. सत्तेत असताना कोणावर टीका टीपणी करणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच मी एक […]
औरंगाबादः हिवाळी अधिवेशनात गायरान जमिनीच्या प्रकरणातून कृषिमंत्री अब्दुल सत्तारांना विरोधकांनी घेरले होते. अधिवेशन संपल्यानंतर सत्तारांनी माझ्याविरोधात शिंदे गटातील जवळचे नेते अडचणीत आणत असल्याचे गौप्यस्फोट केला होता. तर सत्तारांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात एक अडचण आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभेला येणार नसल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिक हे कार्यक्रमस्थळाहून निघून जात होते. त्यावेळी कार्यक्रमाचे आयोजक हे […]
औरंगाबाद : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन झालंय. वयाच्या 102 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्यासाठी त्यांनी सरकारदरबारी अनेकदा मागणी केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवणारा अस्सल मराठवाडी इरसालपणा आणि मराठवाडी बोलीच्याही गोडव्याचा ठसा उमटवणाऱ्या […]
बीड : मला कुठलंच व्यसन नाही असे सांगताच विनायक मेटे म्हणाले, लोकांना दाखवून द्यायचं आहे की, व्यसन केलं नाही तर माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत शिवसंग्रामचे नेते विनायक मेंटेंच्या आठवणींना उजाळा दिल्या. दिवंगत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. […]