मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली लोकसभेचा उमेदवार बदलला. मात्र, त्याचा फायदा होताना दिसत नाही. हिंगोलीकरांचा कौल ठाकरे गटाला.
जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे हे सहाव्यांदा मैदानात आहेत. ते आता सहाव्यांदा षटकार मारणार असा अंदाज वर्तवला जातोय.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेने शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी आपला दिड लाखाने विजय होईल असा अंदाज व्यक्त केला.
हिंगोली जिल्ह्याला एक परंपरा आहे. मोठी आदिवासी लोकसंख्याही आहे. त्यामुळे यावेळी लोकसभेला हिंगोलीकर काय निर्णय घेणार? की परंपरा कायम ठेवणार?
रळी येथील कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बीड पोलीस पुढील तपास करत आहेत.
बीडमधील पाटबंधारे विभागाच्या लाचखोर कार्यकारी अभियंत्याच्या बँकेच्या लॉकरमध्ये कोट्यवधींचा एेवज आढळून आलाय. तब्बल दोन किलो सोने जप्त.