Mahadev Jankar : ‘माझं लग्न नाही, लफडं नाही, कुठंही काही नाही’
Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना महायुतीकडून परभणी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महादेव जानकरांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीसांसह पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेतच जानकरांनी माझं लग्न नाही, लफडं नाही, कुठंही काही नाही असं स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.
नामदेव जाधव, म्हणतात मला शिवाजी महाराजांचा दृष्टांत झालाय… बारामती लोकसभा लढणार
पुढे बोलताना महादेव जानकर म्हणाले, मला महायुतीच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणी लोकसभेची संधी मिळाली आहे. त्याबद्दल मी अजित पवारांसह महायुतीच्या सर्वच पक्षांचा आभारी आहे. परभणी जिल्ह्यासाठी मी एमआयडीसी, एअरपोर्ट आणण्यासाठी प्रयत्न करणार असून समृद्धी महामार्गाला परभणी जोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्दच महादेव जानकरांनी यावेळी परभणीकरांना दिला आहे.
नांदेडमध्ये अशोक चव्हाण-नाना पटोलेंमध्ये फिक्सिंग, प्रकाश आंबेडकरांचा मोठा आरोप
तसेच माझी कुठं शाळा नाही, कॉलेज नाही, काय भानगड नाही. माझं लग्न नाही, लफडं नाही, कुठंही काही नाही, त्यामुळे काळजी करु नका. माझं ध्येय्य जनतेसाठीच असणार आहे. पिटेकर साहेब माझ्यानंतर तुमच्या मुलाला संधी मिळेल. मी त्यावेळी अजितदादा, फडणवीसांना विनंती करीन की मला उत्तर प्रदेशातून निवडणूक लढू द्या, तिकडून मी निवडणूक लढवेन, मला जनतेने दत्तक घेतलं आहे त्याचं पारणं मी चांगलं फेडणार असल्याचंही आश्वासन महादेव जानकरांनी यावेळी परभणीकरांना दिलं आहे.
“फडणवीसांनी आता मणिपूर फाइल्स चित्रपट काढावा, खर्च मी करतो”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
दरम्यान, महादेव जानकर हे महाविकास आघाडीसोबत माढ्यातून लोकसभा लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, 24 मार्च रोजी झालेल्या बैठकीत महायुतीच्या नेत्यांकडून जानकर यांची मनधरणी करण्यात आली. महायुतीच्या जागावाटपाच जानकर यांना एक जागा निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांनी परभणीतून 1 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.