Jitendra Awhad : ‘त्यांच्या नादाला लागले अन् अजित पवार’.. आव्हाडांचे धनंजय मुंडेंना तिखट प्रत्युत्तर
Jitendra Awhad replies Dhananjay Munde : निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे सोपवलं. या निर्णयानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) अजित पवार गटावर सडकून टीका करतात. आताही त्यांनी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे नाव घेत अजितदादांवर निशाणा साधला आहे. आव्हाड म्हणाले, अजित पवार गटाकडून पाकिटमाराप्रमाणे शरद पवारांच्या (Sharad Pawar) मनगटावरचे घड्याळ चोरण्याचा प्रयत्न झाला आहे. पण मनगट अजूनही शरद पवारांकडे आहे. हे मनगट चाळीशीत जितके शक्तिशाली होते तितकेच आज 84 व्या वर्षातही आहे. आताही पक्षाचे नाव आणि चिन्ह वेगळे असले तरी शरद पवार विजय खेचून आणतील, असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला.
‘उरलेली राष्ट्रवादी नाही तर कष्टवादी’ धनंजय मुंडेंचा घणाघात
जितेंद्र आव्हाड पवारांच्या घरात आग लावत आहेत असे वक्तव्य एका नेत्याने केले होते. या वक्तव्यावरही आव्हाड यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले. मी आग लावण्याचे धंदे करत नाही. मी जर काही चुकीचं केलं असतं तर शरद पवारांनी त्याच वेळी माझा कान पकडला असता. उलट तुमच्या नादी लागून पुतण्या (अजित पवार) खराब झाला. जे माझ्या विरोधात बोलले त्यांचं नावही मी घेणार नाही. तु्म्ही तुमच्या बहिणीला आणि काकांना किती त्रास दिला हा इतिहास राज्याला माहिती नसेल पण परळीतल्या गावागावात माहिती आहे, अशा शब्दांत आव्हाड यांनी धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर दिले. यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काय म्हणाले होते धनंजय मुंडे ?
अजितदादा आजही पवार कुटुंबाचे सदस्य आहेत. ते सदस्य नाहीत असं कुणीही म्हटलेलं नाही. कुणाच्या मरणाचा ते दुरान्वयेही विचार करीत नाही. वैऱ्याच्या बाबतही असा विचार अजितदादांच्या मनाला शिऊ शकत नाही. राजकारणात हीन पातळीवर जाऊन दादा राजकारण करतील याची शक्यता नाही. दादांच्या वक्तव्याचा विपर्यास करुन एक सहानूभूतीचा एक भावनिक काळ काढण्याचा आव्हाड प्रयत्न करत आहेत. जे दादा बोलले नाहीत तरीही विपर्यास सुरु असून आव्हाडांच्या डोक्यातच असा हीन विचार सुरु आहे.
‘नाटकी लोकांना किंमत देत नाही तर खुलासा’अजितदादा व जितेंद्र आव्हाडांमध्ये जोरदार जुंपली!