Ahmednagar News : संविधान धोक्यात, समता टिकवण्यासाठी लढ्यात सहभागी व्हा; पवारांचं आवाहन

Ahmednagar News : संविधान धोक्यात, समता टिकवण्यासाठी लढ्यात सहभागी व्हा; पवारांचं आवाहन

Ahmednagar News : संविधानाने समता दिली असून सध्या भारतीय राज्यघटना व संविधान धोक्यात असल्याने सर्वांनी एकजुटीने समतेचा हा विचार टिकवण्यासाठी सुरू झालेल्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) आश्वी बु येथे रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळा व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

Assam Road Accident : आसामात भीषण अपघात! बस-ट्रकच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू, 27 जण गंभीर

यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाणी व वीज हे खाते होते. त्यातून त्यांनी धरणांची निर्मिती करण्यासह पाण्यापासून वीजनिर्मिती करून भारताला एक नवी दृष्टी दिली. याचबरोबर कार्यकर्त्यांचा मोठा संच निर्माण करताना उपेक्षित वर्गामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. हाच वारसा घेऊन बाळासाहेब गायकवाड यांनी काम केले असून अत्यंत खडतर परिस्थितीतून त्यांनी जन माणसांची कामे केली आहेत . सातत्याने लोकांमध्ये राहण्याबरोबर कधीही कायद्याचा गैरवापर केला नाही. संविधानाने समता दिली असून सध्या भारतीय राज्यघटना व संविधान धोक्यात असल्याने सर्वांनी एकजुटीने समतेचा हा विचार टिकवण्यासाठी सुरू झालेल्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

Ashok Chavan : ‘भाजपाच्या संपर्कात कोण, नावं द्या’; चव्हाणांचं थेट विखेंना आव्हान

यावेळी अध्यक्षस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात हे होते. तर व्यासपीठावर मा. आ डॉ सुधीर तांबे, आमदार प्राजक्त तनपुरे ,आमदार सत्यजित तांबे, मा आ प्रकाश गजभिये, ज्येष्ठ नेते रावसाहेब मस्के, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अरुण पा. कडू, सौ दुर्गाताई तांबे, रणजीत सिंह देशमुख, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, उत्कर्षाताई रुपवते, गणपतराव सांगळे, सुधीर मस्के, अशोकराव गायकवाड, सौ वैशालीताई गायकवाड ,सरपंच नामदेव शिंदे, विजय हिंगे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Mahanand Dairy : ‘महानंद’चा कारभार ‘एनडीबीबी’च्या दावणीला; गुजरातस्थित संस्थेला ग्रीन सिग्नल?

तर थोरात म्हणाले की, ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार यांनी कायम कार्यकर्त्यांना बळ दिले आहे .राज्यभरातील हाडाचे कार्यकर्ते शोधून त्यांना संधी दिली आहे .सर्वसामान्यांचा सन्मान करणे हे त्यांचे वैशिष्ट्य असून कृषी मंत्री पदाच्या काळात सहा वर्ष पवार साहेबांबरोबर काम करताना राज्याचे विक्रमी कृषी उत्पन्न केले. राज्यातील प्रत्येक विभागाची खडानखडा माहिती असलेले नेतृत्व खा. शरदचंद्र पवार असून त्यांनी आज अश्वितील सर्वसामान्य कार्यकर्त्याचा गौरव केला आहे. बाळासाहेब गायकवाड यांनी कायम पुरोगामी विचार जपला असून समाजात तेढ निर्माण होऊ दिली नाही. चांगले काम केल्यामुळे या परिसरामध्ये खोट्या केसेस दाखल करण्याचे सत्र सुरू झाले असून अशा संकट काळात बाळासाहेब गायकवाड हा नेहमी सत्यतेच्या बाजूने उभे राहिले असल्याचेही ते म्हणाले.

IND vs SA 2nd Test : आज टीम इंडिया आफ्रिकेला भिडणार; ‘या’ स्टार खेळाडूचा पत्ता होणार कट?

तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, पवार यांनी देशभरात जमवलेली कार्यकर्त्यांची फळी हीच मोठी संपत्ती आहे. तर आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या न्यायालयात मविआ सरकारलाच बहुमत मिळणार. आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. तर माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की, जातीयवादी आणि धर्मांध शक्तीचा विचार रोखण्यासाठी आता संविधान वाचवणाऱ्या विचाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा.

खा पवारांनी ज्यांना मोठे केले ते पळाले- बाळासाहेब गायकवाड

खासदार शरदचंद्र पवार यांनी अनेकांना मोठमोठे पदे दिली. मात्र ते पळून गेले .मात्र पवार साहेब भक्कमपणे उभे आहेत 83 वर्षाचा योद्धा लढतो आहे आणि तुम्ही ईडीला घाबरून घाबरून पळत आहात. अशी टीका करताना आपण कायम पुरोगामी विचार जपला असून यापुढील काळात खासदार शरदचंद्र पवार व आमदार बाळासाहेब थोरात यांच्यात नेतृत्वाखाली काम करणार, असून जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी पूर्ण समाजाची ताकद एकत्र करू. असे सांगताना याचबरोबर देहदान करणार असल्याची घोषणा करत ते पत्र खासदार शरद पवार यांच्या हस्ते डॉ तांबे यांच्याकडे सुपूर्द केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube