काळजाला सुनेत्रा पवारांनी दिलेलं फुलं; लाडक्या बहिणींशी संवाद साधताना अजितदादांच्या रडारवर विरोधक
Ajit Pawar News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून घोषणांचा पाऊस केला जात असतानाच आता या योजनांची परिपूर्ण माहिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आजपासून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केलीयं. वाढदिवसांच्या दिवशीच अजितदादांनी अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात महिलांच्या योजनांबद्दलच्या अडचणी समजून घेण्यासाठी थेट लाडक्या बहिणींशी संवाद साधलायं. महिलांच्या योजनांची माहिती देताना अजित पवार यांनी विरोधकांच्या ‘चुनावी जुमला’च्या टीकेवरुन विरोधकांना रडारवर घेतल्याचं दिसून आले आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांनी आज आपल्याला कोटाला पत्नी सुनेत्रा पवार यांनी दिलेलं फुल लावून आल्याचं दिसून आले आहेत. त्यामुळे अजितदादांनी सुनेत्रावहिनींनी दिलेलं फुल काळजाला लावल्याचंच पाहायला मिळालंय.
मला कुणी विरोधक नाही; असं का म्हणाले नगरचे खासदार? पाहा लेट्सअप मराठीवर बेधड निलेश लंके
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी अनेक योजनांची तरतूद केलीयं. यामध्ये महिलांना तीन गॅस सिलेंडर, पिंक रिक्षा योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, यासोबतच इतर योजना आहेत. या योजनांमध्ये येत असलेल्या अडचणी थेट लाडक्या बहिणींनाच विचारुन त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न येत असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अनेक महिलांनी आपल्या उत्पन्नाबाबत माहिती देऊन आम्हालाही योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी अजित पवार यांच्याकडे केली आहे. यावेळी बोलताना अजितदादांनी आम्ही महिलांसाठी केलेल्या योजना पुढील काळातही सुरुच ठेवणार असल्याचा वादा हा अजितदादा करत असल्याचा शब्दच दिला. अजितदादांनी वादा करताच उपस्थित महिलांमधून टाळ्यांचा कडकडाट वाजल्याचं पाहायला मिळालं.
निपाह व्हायरसचा धोका वाढला, केरळमध्ये 14 वर्षीय मुलाचा मृत्यू, नातेवाईकांना निगराणीत ठेवले…
बहीणी सक्षम झाल्या तरच…
आम्ही गोरगरीब मध्यमवर्गीय महिलांना फुल न फुलाची पाकळी देत आहोत. याला विरोधक चुनावी जुमला म्हणत आहेत. एवढंच नाही तर विरोधक म्हणतात बहीणींना दिलं भावाला काय? जर बहीणी सक्षम झाल्या तरच देश पुढ जाईल ना? असा थेट सवाल अजित पवार यांनी विरोधकांना केलायं.
अडीच कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ द्यायचायं…
यंदाच्या वर्षाचा अर्थसंकल्प संकल्प सादर केला. मात्र यामध्ये प्रामुख्याने आम्ही माझी लाडकी बहीण योजना ही आणली. महिला मोलमजुरी करतात अनेक काम करतात महिलांना आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही ही योजना आणल्या आहेत. अडीच कोटीपेक्षा जास्त अडीच कोटींपेक्षा अधिक महिलांना मला या योजनेचा लाभ द्यायचा आहे. आज आम्ही तुमच्या जवळ आलो आहेत आम्ही तुम्हाला जागे करण्यासाठी आलो आहोत. अजून हा फॉर्म भरावा व या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन अजित पवार यांनी केलंय.
दरम्यान, अजित पवार यांना आजच्या आयोजित कार्यक्रमाला येण्यासाठी उशिर झाल्याने भाषण सुरु असतानाच अजितदादांनी उपस्थित लाडक्या बहिणींची हात जोडूनच माफी मागितली आहे. यावेळी अनेक महिलांनी आपल्या अडचणी सांगत असताना अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षावही केल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आजच्या दिवशी अजितदादांनी लाडक्या बहीणींकडून आगामी विधानसभा निवडणुकीतही आशिर्वाद मिळतील, असं बोललं जात आहे. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत महायुतीला लाडक्या बहीणींचा कितपत आशिर्वाद मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.