“तुमच्या बेगडी हिंदुत्वावर लोक विश्वास ठेवणार नाही, राहुल गांधीच तुम्हाला..”, खताळांचा थोरातांवर हल्लाबोल

“तुमच्या बेगडी हिंदुत्वावर लोक विश्वास ठेवणार नाही, राहुल गांधीच तुम्हाला..”, खताळांचा थोरातांवर हल्लाबोल

Amol Khatal replies Balasaheb Thorat : ‘संगमनेर तालुक्यातील जनतेनं परावभ करुन तुमचा खुळखुळा केला आहे. तुमच्याविषयी कोणतीही सहानुभूती आता राहिलेली नाही. तालुक्यातील विकासाची घडी आता चांगल्या पद्धतीने बसत असल्याने तुम्हाला सहन होत नसल्यामुळेच मोर्चे काढण्याची वेळ आली आहे. परंतु तुमच्या बेगडी हिंदुत्वावर जनता विश्वास ठेवणार नाही. मला कोणी समज देण्याचे सल्ले देण्यापेक्षा भविष्यात राहुल गांधीच तुम्हाला आता समज देवून घरात बसवतील’, अशी खरमरीत टीका आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी काँग्रेसचे माजी आमदार बाळासाहेब थोरातांवर केली.

खताळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका केली. माजी आमदारांनी काढलेल्या मोर्चाबद्दल मला कोणतेही भाष्य करायचं नाही. त्यांनी खतपाणी घातल्यामुळेच घुलेवाडीतील घटनेला राजकीय वळण मिळालं. कटकारस्थान करुन किर्तनामध्ये त्यांच्या स्वीय सहायकानेच गोंधळ घातला. आज भगवे झेंडे घेवून तुम्ही सहानुभूमी मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरला असला तरी सोयीनुसार हिंदुत्ववाद स्वीकारण्याचा तुमचा प्रयत्न जनतेनं केव्हाच ओळखला आहे, अशी टीका खताळ यांनी केली.

तत्त्वांसाठी मरण्यासही तयार! संगमनेरच्या विराट मोर्चातून बाळासाहेब थोरातांची थरकाप उडवणारी घोषणा

थोरात समर्थकांचा विशाल मोर्चा

किर्तनकार संग्राम बापू भंडारे (Sangram Bhandare) यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना (Balasaheb Thorat) नथुराम गोडसे स्टाईलने धमकी दिली. त्यांच्या या वक्तव्याच्य निषेधार्थ गुरुवारी संगमनेर शहरात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात थोरात समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी भाषणात थोरात यांनी भंडारे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

मोर्चादरम्यान थोरात म्हणाले , मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा आहे. माझ्यासाठी तत्त्वं, विचार हे सर्वांत महत्त्वाचे आहेत. त्यासाठी मला मृत्यूला सामोरं जावं लागलं तरी मी तयार आहे. मी गांधीजी होऊ शकत नाही, हे मला माहीत आहे; पण तत्त्वांवर ठाम राहण्यासाठी मी मरणार असलो तरी हरकत नाही. विरोट मोर्चामध्ये बाळासाहेब थोरात यांनी संग्राम भंडारे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम दाखवला.

आज संपूर्ण महाराष्ट्र गोंधळलेला आहे. बीडमधील घटना सर्वांना आठवतेय. विधानसभेत मारामाऱ्या होतात, मंत्र्यांकडे नोटांचे बंडल सापडतात. ही प्रकरणं झाकण्यासाठी कोकाटेंचा बळी देण्यात आला. यामागचं सत्य लोकांसमोर आलंच पाहिजे. तसेच एका विद्यमान आमदारावरही त्यांनी निशाणा साधला. तो आमदार माझा डीएनए तपासा असं म्हणतो. म्हणजे थेट माझ्या आईवर बोलतो. अशा प्रकारची भाषा आधी धांदरफळ येथे ऐकली होती. आता आमदारही तशीच भाषा बोलतो, ही निंदनीय बाब आहे, असा थेट आरोप थोरातांनी केला होता.

“फास्ट गाडीचाही अपघात होतो, क्रेडिट घ्यायचंच असेल तर..”, थोरातांनी सुजय विखेंना कोणता सल्ला दिला?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube