नाशिकः विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसलाय. नाशिकमधील माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात आज प्रवेश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तनुजा या नाशिक पदवीधर मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवार असणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत जागा वाटपावरून भाजप आणि शिंदे गटात वाद झाला होता. […]
नवी दिल्ली : सीबीएसईने दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १५ फेब्रुवारीपासून ही परीक्षा सुरू होणार आहेत. ‘सीबीएसई’ कडून दोन्ही बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रक पाहता येईल. CBSE १० वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ दरम्यान, तर १२वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते […]
नाशिक : राज्यातील नाशिकमधून अत्यंत महत्त्वाची व धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकमधील सुरगाणा परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्याची घटना घडली आहे. सुरगाणा परिसरात 2.6 रिश्टर स्केलची भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रात्री उशिरा हे हादरे भूकंपाचे असल्याचा दुजोरा प्रशासनाकडून मिळाला आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने कुठलीही मोठी जीवित […]
जळगाव: संजय राऊत यांना किती गांभीर्याने घ्यावं हा आता खरं तर विचार करण्याचा विषय आहे. वाट्टेल तसं ते बोलत असतात. काहीही बोला, खोटं बोल पण रेटून बोल अशी सध्या संजय राऊत यांची अवस्था झाली आहे, असा शाब्दिक टोला भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे. संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री महाजन […]
नागपूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ९०० पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटारडे आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यातही भाजपाचा दारूण पराभव झाला असून गावखेड्यातील लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला सपशेल नाकारले आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रीया काँग्रेस […]
अहमदनगरः कीर्तनकार निवृत्ती इंदोरीकर महाराज यांच्या सासू शशिकला शिवाजी पवार या थेट ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणूक लढल्या. निवडून येत संगमनेर तालुक्याच्या निळवंडे गावच्या सरपंच झाल्या आहेत. शशिकला पवार यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत सुशिला उत्तम पवार यांचा २२७ मतांनी पराभव केला. संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यात थोरात गटाने २७, विखे गटाने ९ […]