वादा निभाना पडेगा! पठारेंनी पारनेरमधून विधानसभेचे रणशिंग फुंकले…
Shrikant Pathare : महाविकास आघाडीचा धर्म पाळत लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांना निवडून आणा, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पारनेर मतदारसंघाची जागा ही ठाकरे गटाला सोडण्यात येईल, असा शब्द आम्हांला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला होता. त्यामुळे आता दिलेला शब्द पाळला जाईल, अशी आम्ही अपेक्षा करतो अशा शब्दांत ठाकरे गटाचे पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे (Shrikant Pathare) यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक आहे, त्यापूर्वीच आता पारनेरमध्ये राजकीय मोर्चेबांधणी सुरू झालीयं. ठाकरे गटाच्यावतीने पारनेरमध्ये महाराष्ट्र अस्मिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याला ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे या उपस्थित होत्या. यावेळी मंचावरूनच श्रीकांत पठारे यांनी राजकीय टोलेबाजी करत विधानसभेचे रणशिंग फुंकले.
पुणे : अजित पवार गटाचे मंगलदास बांदल अडचणीत; एकाचवेळी सहा ठिकाणी ईडीची छापेमारी
यावेळी बोलताना पठारे म्हणाले, शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर काही गद्दारांनी शिवसेनेचा घात करत वेगळीच चूल मांडली. मात्र, त्या काळातही आम्ही ठाकरे यांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिलो. पारनेर तालुक्यातील शिवसेना अभेद्य राहील. निलेश लंके यांच्या विजयामध्ये शिवसेनेच्या वाघांचा महत्त्वाचा वाटा राहिला. लोकसभेमध्ये आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळला. ठाकरे यांच्या आदेशानुसारच आम्ही लंके यांच्या पाठीशी उभे राहिलो, त्यांना पारनेर मतदारसंघातून मोठं मताधिक्य मिळवून दिलं असल्याचं पठारेंनी स्पष्ट केलंय.
पारनेरच्या जागेचा संजय राऊतांनी दिला शब्द :
पारनेर विधानसभेची जागा ही ठाकरे गटाला सोडण्यात येईल, दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही लोकसभेला लंके यांना निवडून आणले. पण आता येणाऱ्या काळात कोण कसा शब्द पाळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लंकेंना निवडून आणा, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाळण्याचे जागा ठाकरे घाटाला सोडण्यात येईल, असा शब्द ठाकरे संजय राऊत यांनी दिला होता, असे यावेळी बोलताना श्रीकांत पठारे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपदी बसवायचे…
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेला आपली ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे यांनाच विराजमान करायचे असा आम्ही निर्धार केला आहे. उद्धव ठाकरे राजकारणी नाही तर समाजकारणी आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवा यासाठी आपण सर्व सज्ज रहा, असं यावेळी बोलताना पठारे म्हणाले आहेत.