राष्ट्रवादीची साथ सोडत भांगरे भाजपात; झेडपी अध्यक्षपदाचे समीकरण विखेंनी जुळवले

Sunita Bhangare : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भांगरे कुटुंब हे सातत्याने मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या संपर्कात होते. अखेर आज भांगरे यांचा भाजप प्रवेश.

  • Written By: Published:
Sunita Bhangare Joined BJP Akole Ahilaynagar Zilla Parishad

Sunita Bhangare joined BJP:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालीय. आता मोठी राजकीय उलथा- पालथ नगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्या सुनीता भांगरे (Sunita Bhangare) यांनी भाजपामध्ये ( BJP) पक्षप्रवेश केलाय. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भांगरे कुटुंब हे सातत्याने मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या संपर्कात होते. अखेर आज भांगरे यांच्या भाजप प्रवेशाने येणाऱ्या निवडणुकींचे गणित हे जुळून आल्याचे देखील आता बोलले जात आहे.

खळबळजनक! छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक, तब्बल 116 जणांना अटक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणाऱ्या काळात पार पडणार आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने मोठ्या राजकीय उलथा-पालथ ही नगर जिल्ह्यात सुरू झाली. यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गा राखीव आहेत. त्यामुळे भांगरे या भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. भांगरे यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य होत्या. ( Sunita Bhangare joined BJP akole ahilaynagar Zilla Parishad )

अशोक भांगरे यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी अकोल्यात येत विधानसभा निवडणुकीसाठी अमित भांगरे यांना बळ दिले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत भांगरे यांचा पराभव झाला. गेल्या काही दिवसांपूर्वी भांगरे कुटुंबीयांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेतली होती. यातच भाजपला देखील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार हवा होता. मंत्री विखे यांची मध्यस्थिती व स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भांगरे यांनी जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपामध्ये प्रवेश केलाय.


सात अधिकाऱ्यांच्या बदल्या; आरोग्य, पाणीपुरवठा विभागात बदल, तर पुणे महानगरपालिकेत पवनीत कौर


जिल्ह्यात राष्ट्रवादीला गळती

लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला (शरद पवार) यश मिळाले. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभेनंतर पक्षाला जणू गळतीच लागली. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद महानगरपालिका या निवडणुका पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादीचे शरद पवार गटाला एका पाठीमागे एक धक्के बसत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले राजेंद्र फाळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. व आता त्यानंतर राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असलेल्या सुनिता भांगरे यांनी देखील शरद पवारांची साथ सोडत भाजपामध्ये प्रवेश केला. आगामी निवडणुका पाहता राष्ट्रवादीला पक्ष बळकटीकरणासाठी मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार हे मात्र निश्चित.


अकोले शत प्रतिशत भाजपमय करू…मंत्री विखे

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घोषित केल्या प्रमाणे जिल्ह्यातील आॅपरेशन लोटसला अकोले तालुक्यातून सुरूवात झाली झालीय. अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या व्हा.चेअरमन सुनिता भांगरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश घडवून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले आहे. अकोले शत प्रतिशत भाजपमय करू, असे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी म्हटलंय.

मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनीता भांगरे, दिलीप भांगरे यांच्यासह अकोले तालुक्यातील अनेक गावांचे सरपंच आणि कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले. माजी आमदार वैभव पिचड, जेष्ठ नेते सिताराम भांगरे, कोपरगावचे माजी नगराध्यक्ष सुहास वहाडणे, विनायकराव देशमुख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

follow us