Sanjay Raut News : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खोचक शब्दांत टीका केली. राऊत यांनी आज जळगावात उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना विखे पाटील […]
Raosaheb Danve : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी काल परशुराम जयंतीनिमित्त जालना शहरात आयोजित कार्यक्रमात राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या कार्यक्रमात दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाबाबत भाकित केले. या कार्यक्रमात ते म्हणाले, ‘मागच्या परशुराम जयंतीला मी उपस्थित होतो. त्यावेळी नगरपालिकेचे चार तिकीट सगळ्या […]
Sanjay Raut : राज्य सरकार कोसळणार का असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. याबाबत आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले, सध्या जे मुख्यमंत्री आणि 40 लोकांचे राज्य आहे ते पुढील पंधरा दिवसात गडगडल्याशिवाय राहणार नाही. या सरकारचे डेथ वॉरंट निघालेले आहे. फिनीश, पुष्पचर्क अर्पण करा, अशा […]
Jayant Patil : शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे गटातली आमदारांनी एकनाथ शिंदेसोबत जात वेगळा गट तयार केला. शिंदे यांनी फडणवीसांसोबत जात राज्यात सरकार स्थापन केले. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र आता न्यायालयात सुरु असलेल्या 16 आमदारांवरील अपात्रतेबाबत कोर्ट काय निकाल देणार यावर आगामी राजकारण बदलू शकते. तसेच ते 16 आमदार जर अपात्र ठरले तर पुन्हा […]
Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जावयाबद्दल धक्कादायक विधान केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. सरकारकडून माझ्या जावयाला विनाकारण त्रास देऊन अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांच्या जावयावर भोसरी खंडातील […]
Kharghar Tragedy: महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेले आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने पत्र दोन दिवसांपासून व्हायरल झाले होते. हे पत्र बनावट असल्याचे धर्माधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले होते. आता याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याचा तपास रायगड स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा खारघर येथे झाला होता. सुमारे वीस […]