Crops on more than nine thousand hectares in Ahmednagar district were affected : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) थैमान घातले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या भागात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीठ झाली. चार दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अहमदनगर जिल्ह्यात गारपीट, […]
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रसचा (NCP)राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच तृणमूल कॉंग्रेस (Trinamool Congress)आणि सीपीआय (CPI)या पक्षांचाही राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. […]
महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर आता नागपूर आणि महाराष्ट्र दिनी थेट राजधानी मुंबईमध्ये सभा घेतली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित केलेल्या सभेला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे […]
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस 28 मे हा दिवस गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात ट्विटरद्वारे घोषणा केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे,अशी घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले […]
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक महत्वाच्या व्यक्तींना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आता थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल आला आहे. त्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत. 112 या क्रमांकावर एक फोन आला होता. त्यावरून त्या व्यक्तीने “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” असं बोलून हा कॉल कट केला. त्यानंतर अचानकपणे […]
मुलींनी बिनधास्त भिडायचं असतं कारण, मुलांना आपणच जन्म देत असल्याचं ठामपणे नृत्यांगणा गौतमी पाटीलने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. सध्या महाराष्ट्रात असं कुठलं गाव नसेल तिथं सबसे कातिल गौतमी पाटील हे नाव माहित नसेल. कारण आपल्या दिलफेक अंदाजानं गौतमी पाटीलने महाराष्ट्रातल्या तरुणांवर भूरळ पाडलीय. टीका-टिपण्या, आरोपांना सामोरं जात तिने महाराष्ट्रात आपला एक चाहतावर्ग निर्माण केलाय. एका […]