अहमदनगर : आजच्या शिमग्याच्या दिवशीच अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील काही भागांत सायंकाळी प्रचंड गारपिटीसह झालेल्या पावसाने झोडपून काढले आहे. गारपीटीनंतर तालुक्यातील शेतशिवारासह रस्ते बर्फाच्छादित झाले आहेत. तालुक्यात अचानक झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोंगणीला आलेलं पिक गारपीटीमुळे आडवे झाले आहे. अचानक प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपीटीने सोंगणीला आलेल्या पिकांचे नूकसान झालंय. यामध्ये […]
अहमदनगर : क्षेत्र मढी येथे शेकडो वर्षाची परंपरा असलेली गोपाळ समाजाची मानाच्या होळी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात पेटली. पोलिसांना चकवा देत गडाकडे जाणारा पारंपारिक मार्ग मानकऱ्यांनी अचानक बदलल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत मूळ मार्गाकडे वळवले. त्यामुळे तणाव निवळण्यास मदत झाली. होळी पेटल्यानंतर एक तासाने दोन गटात हाणामारी होऊन एका गटाने दुसऱ्या गटावर अचानक हल्ला केला. पोलिसांनी […]
मुंबई : आजचा होळीचा चांगला दिवस आहे, चांगलं काहीतरी बोला, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत विचारल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी राऊत यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी यंदा पहिल्यांदाच होळी साजरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होलिका मातेचे […]
अहमदनगर : कानिफनाथ महाराज की जय,असा जयघोष करत कैकाडी समाजाची मानाची काठी कळसाला व समाधीला भेटून श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथांचा यात्रा उत्सवाची आजपासून सुरुवात झाली. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत ही यात्रा चालते. धार्मिक परंपरेनुसार वारी रविवारी (ता.५) रात्री पाथर्डी शहरातून वाजतगाजत मानाच्या काठीची मिरवणूक निघाली. डफांचा पारंपारिक तालात मिरवणूक’ रात्रभर मिरवत सकाळी मढीला आली. ग्रामप्रदक्षिणा […]
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर (Yogesh Bhoir) यांच्या घरावर अँटी करप्शन ब्युरो (Anti Corruption Bureau) छापेमारी केली. ३ तास चाललेल्या छापेमारीत त्यांच्याकडे ८५ लाखांची अधिकची मालमत्ता सापडली असल्याने एसीबीने योगेश भोईर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मालाड, कांदिवली पूर्व येथील माजी नगरसेवक तसेच मागाठाणेचे उपविभाग प्रमुख […]
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरी नागपूरच्या एका सराफ व्यावसायिकाने गोंधळ घातल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. नाना पटोले यांच्या स्वीय सहाय्यकाने आपली दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा करत नाना पटोलेंच्या घरी या सराफ व्यावसायिकाने गोंधळ घातला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वड्याचे तेल वांग्यावर, हे काम ठाणे महानगरपालिकेचे नव्हे […]