औरंगाबादः हिवाळी अधिवेशनात गायरान जमिनीच्या प्रकरणातून कृषिमंत्री अब्दुल सत्तारांना विरोधकांनी घेरले होते. अधिवेशन संपल्यानंतर सत्तारांनी माझ्याविरोधात शिंदे गटातील जवळचे नेते अडचणीत आणत असल्याचे गौप्यस्फोट केला होता. तर सत्तारांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात एक अडचण आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभेला येणार नसल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिक हे कार्यक्रमस्थळाहून निघून जात होते. त्यावेळी कार्यक्रमाचे आयोजक हे […]
औरंगाबाद : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन झालंय. वयाच्या 102 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्यासाठी त्यांनी सरकारदरबारी अनेकदा मागणी केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवणारा अस्सल मराठवाडी इरसालपणा आणि मराठवाडी बोलीच्याही गोडव्याचा ठसा उमटवणाऱ्या […]
शिर्डी : नववर्षानिमित्त बेंगलोर येथील दानशुर साईभक्त राजा दत्ता व सौ.शिवानी दत्ता यांनी 928 ग्रॅम वजनाचा 46 लाख 70 हजार 624 रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिला आहे. दत्ता दाम्पत्यांनी हा सुवर्ण मुकुट संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे सुपुर्त केला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षीच म्हणजे 2022 मध्ये […]
मुंबई : कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर जगभरातील लोकांनी अत्यंत जल्लोषात नाचतगात नववर्षाचं स्वागत केलं. या सरत्या वर्षी तळीरामांनी देखील आपली इच्छा मनसोक्त पूर्ण केल्याचे दिसून आले. चालू आर्थिक वर्षामध्ये मद्याच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून सरकारी तिजोरीत चांगलीच भर पडली आहे. कोरोना काळात अर्थव्यवस्थेचे चाक लॉकडाउनमध्ये रुतल्याने सरकारसमोर महसूलाचा प्रश्न निर्माण झाला होता. आता, कोरोनानंतर […]
कोल्हापूरः माझ्या पक्षातील काही नेत्यांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचल्याचा गौप्यस्फोट कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलाय. त्यामुळे शिंदे गटामध्ये अंतर्गत कुरघोडी सुरू झाली असल्याची चर्चा आहे. त्यावर आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. अनेकवेळी ते गंमतीने बोलतात. त्यांना किती गंभीरपणे घ्यायचे मला माहिती नाही, असे केसरकर म्हणाले. हिवाळी अधिवेशनात शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर […]
मुंबई : राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर जाणार आहेत. शनिवारपर्यंत वेळ देऊन देखील चर्चेचे निमंत्रण न मिळाल्याने उद्यापासून संपावर जाण्याच्या निर्णयावर ‘मार्ड’ ठाम आहे. त्यामुळे राज्यभरातील पाच हजारांहून अधिक डॉक्टर संपावर जाणार आहे. यामुळे नवीन वर्षाच्या सुरवातीलाच आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. दरम्यान मार्डने काही दिवसांपूर्वीच आपल्या मागण्या प्रशासन, सरकारसमोर मांडत संपावर जाण्याचा इशारा दिला […]