नागपूरः शिवसेनेतील दोन्ही गटामध्ये जोरदार संघर्ष सुरूच आहे. बुधवारी मुंबई महानगरपालिकेतील मुख्यालयातील पक्ष कार्यालयाच्या ताब्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये जोरदार राडा झाला. त्यावरून काही वेळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे आता शिंदे गट हा शिवसेना भवनाचा ताबा घेईल, असे बोलले जात आहे. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या गटावर जोरदार […]
प्रफुल्ल साळुंखे : २०२२ हे वर्ष महाराष्ट्रासह देशभरातील राजकारणासाठी अतिशय धक्कादायक ठरलं. अभूतपूर्व असं सत्ताबदल जे देशभरात गाजलं. यासह अनेक घडामोडीची नोंद इतिहासात झाली. नवाब मलिकांना अटक वर्षाच्या सुरुवातीला २४ फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांच्या रूपाने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला. दाऊद इब्राहिम यांची ३०० कोटीची मालमत्ता खरेदी केल्या प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना […]
पुणे : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात राज ठाकरे यांनी बुधवारी सहजीवन व्याख्यानमालेत व्याख्यान दिलं, ‘नवं काहीतरी’ असा त्यांच्या व्याख्यानमालेचा विषय होता. यावेळी त्यांनी व्याख्यान आणि भाषणात फरक काय असतो याबद्दल सांगितलं. ते म्हणाले की, आजपर्यंत आपण अनेकदा मोठ्या ठिकाणी भाषणं केली. सभा घेतल्या मात्र व्याख्यानमालेत आणि भाषणात फरक काय असतो ते सांगतो. व्याख्यानात जरा शांत […]
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेमध्ये ‘नवं काहीतरी’ या विषयावर व्याख्यान दिलंय. यावेळी राज ठाकरे यांनी राजकारणाची घसरलेली पातळी, नगर नियोजन, राजकारण, महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, राजकारणपासून दूर राहणारा समाज आदी गोष्टींवर प्रकाश टाकला. विविध गोष्टींना कसे फाटे फुटतात? प्रवक्ते कसे बोलतात, काही ऐकूच नये, पाहू नये असे वाटते. […]
अहमदनगर : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश विश्वाला देणाऱ्या शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिरात देश-विदेशातून भाविक दर्शनासाठी येत असतात. दरवर्षी कोट्यवधी साईभक्त शिर्डीत दर्शनासाठी येतात. ते श्रद्धेतून बाबांच्या झोळीत भरभरून दानही अर्पण करतात. यातच साईचरणी वर्षभरात तब्बल 400 कोटींचे दान प्राप्त झाले आहे. मागील वर्षापेक्षा यंदाच्या दान रक्कमेत मोठी वाढ झाली आहे. साईचरणी साई भक्तांनी भरभरून दान […]
संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून राज्यात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतानाच, या निवडणुकीचे रणशिंग महाराष्ट्रातील संभाजीनगर येथून फुंकले जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 2 जानेवारी रोजी संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत. नड्डा यांच्या या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील भाजपचे सर्वच महत्वाचे नेते उपस्थित राहतील. विशेष म्हणजे […]