अहमदनगर : शिवसेनेच्या बंडानंतर शिंदे गटाने भाजपच्या सहकार्याने राज्यात सत्ता स्थापन केली व यामुळे महाविकास आघाडी सरकारची सत्ता संपुष्टात आली. मात्र येत्या दीड महिन्यात पुन्हा आपलेच सरकार येईल असे भाकीत राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी एका कार्यक्रमात केले आहे. लंके यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील […]
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी द्वेष पसरवणाऱ्या भाषणांबद्दल महत्त्वाचं निर्देश दिले आहेत. मुंबईत काढण्यात येणाऱ्या हिंदू जन आक्रोश रॅली संदर्भात हे निर्देश देण्यात आले आहेत. कोर्टाने सांगितले की, 5 फेब्रवारीला मुंबईत होणाऱ्या हिंदू जन आक्रोश रॅलीला परनवानगी देताना सरकारने याची खात्री कारावी की, या रॅलीमध्ये कोणत्याही प्रकारचे द्वेष पसरवणारे भाषणं केली जाणार नाही. जस्टिस […]
वर्धा : एखादी कथा किंवा एखादी कादंबरी यामुळे वादळ उठल्याचा आणि तिच्या लेखकांना प्रचंड मनस्ताप भोगाव्या लागल्याच्या घटना समाजात घडत आहेत. इतिहासाकडे निर्लेपदृष्टीने पहावयास अद्याप आम्ही तयार झालेलो नाही. काय प्रदर्शित करावे याचा निर्णय घेण्याचा अधिकार लेखक, दिग्दर्शकाला असला पाहिजे, असे आवाहन 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) अध्यक्ष […]
राहुरी : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दहावा दिवस. त्यामुळे दहाव्या दिवशी कृषी अभियंत्यांनी मुंडन करून राज्य लोकसेवा आयोगाच्या भूमिकेचा निषेध केला. कृषी अभियंत्यांचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या भूमिकेच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन सुरू आहे. काल प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले होते तर आज कृषी अभियंत्यांनी मुंडन करून महाराष्ट्र राज्य […]
अहमदनगर : अहमदनगर शहरातील वसंत टेकडी येथील जुनी 68 लाख लीटर पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होत होता. अनेक वर्षांची ही टाकी असल्यामुळे तिची गळती मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. तातडीने टाकीची दुरुस्ती केली. त्यामुळे संपूर्ण नगर शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. पाणी प्रश्न मार्गी लागणार फेज टू योजनेमधील विविध भागातील टाक्या कार्यान्वित होणार आहेत. नगर […]
मुंबई : अमरावती पदवीधर मतदार संघात (Amravati Graduate Constituency) भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे माजी राज्यमंत्री रणजित पाटील (Ranjit Patil) पराभूत झाले आहेत. राज्यातील भाजपासाठी सर्वात सुरक्षित मतदार संघ असताना झालेला पराभव जिव्हारी लागणारा आहे. या निवडणुकीचे विश्लेषण म्हणजे रणजित पाटील यांचे मतदार आणि कार्यकर्त्याना गृहीत धरणे, विरोधी […]