राहाता : जगातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता इंडियन मेडिकल असोसिएशनने देशातील नागरिकांना मास्क वापरण्याचे व कोरोना विषयक नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साई संस्थाननेही शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. कोरोना बीएफ-७ सब व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सरकारने भारतातील सर्व विमानतळांवर परदेशी प्रवाशांची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिर्डीच्या […]
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील ब्राम्हणी येथील एका हिंदू महिलेचे बेकायदेशीर धर्म परिवर्तन करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या भारतीय मानवाधिकार परिषदेने उघडकीस आणला होता. या धर्मांतरण प्रकरणाचे आज विधानसभेत पडसाद उमटले. आमदार राम सातपुते यांनी ‘पीआय’ प्रताप दराडे याचे धर्मांतराला संरक्षण असल्याचा आरोप केला. यासंदर्भात नगर धर्मांतरण प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रताप […]
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात अभिनेता सुशांत सिंह राजपूतची सेक्रेटरी दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावर राजकीय नेत्यांकडून अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात येत आहेत. विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील भाजपच्या विधानसभा सदस्यांकडून हा मुद्दा जोरदार उचलून धरला असून दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याबाबत मागणी करण्यात आली. या मागणीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
नागपूर : हिवाळ अधिवेशानाच्या चौथ्या दिवशी झालेल्या गदारोळाचे पडसाद उमटत असताना आज पाचव्या दिवशीही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रती सभागृह उभे करुन आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्ताधारी सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आले आहे. यावेळी विधान भवनाच्या पायर्यांवर प्रती सभागृह भरवून महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, माजी […]
नागपूर : सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू द्या एक इंच देखील जमीन तुमच्या भागात जाऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आज दिला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद भडकवणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले. बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या […]
नागपूर : राज्यातील शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात १२ वर्षांनंतर मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना सरकारकडून खास ख्रिसमस गिफ्ट मिळाले आहे. त्यामुळे आता राज्यातील शिक्षण सेवकांचे मासिक मानधन हे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या प्रवर्गांना आधी अनुक्रमे 6 हजार, 8 हजार, 10 हजार अशा प्रकारे मासिक मानधन मिळत होत. आता सुधारित मासिक मानधनाप्रमाणे राज्यातील […]