नागपूर : मला निलंबित केलात तरी राज्यातील तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या प्रश्नांसाठी मी लढतच राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. तसेच राज्य सरकारच्या या हुकुमशाही कृतीचा निषेध देखील त्यांनी केलाय. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांचा वारंवार आवाज दाबण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसह […]
नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांना विधानसभेतून आज नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्याचा निर्णय राजकीय वर्तुळात कमालीचा धक्कादायक ठरला आहे. अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप हे दोघेही आजपासून आक्रमक झाल्याचे दिसून आले. दिशा सलियान मृत्यूप्रकरणी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मोर्चे बांधणी करण्यात सत्ताधारी पक्षाला यश आले. […]
आमदार मुक्ता टिळक यांचे निधन पुणेः पुण्यातील भाजप आमदार मुक्ता शैलेश टिळक यांचे आज निधन झाले. त्या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या कर्करोगाशी सामना करत होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुण्याचे महापौरपद त्यांनी भूषविले होते. त्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या. लोकमान्य टिळक यांच्या घराण्यातील सुनबाई म्हणून त्यांना मान होता. […]
नागपूर : हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांबद्दल अपशब्द बोलल्याने राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. यासंदर्भातील ठराव मंत्री चंद्रकात पाटील यांनी मांडला. सभागृहात विविध प्रश्नांवर बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांबद्दल असंवैधानिक या शब्दाचा उल्लेख केला होता. त्यानंतर सभागृहात लगेचच जयंत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर या प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित […]
नागपूर : करोडो रुपयांचे कॉट्रॅक्ट घेऊन आमदार निवासाच्या स्वच्छतागृहामध्ये चहाचे कप भांडी धुण्याचे प्रकार उघडकीस आल्यानं यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात कडाडल्याचं चित्र पाहायला मिळालंय. ते म्हणाले, हा कसला नालायकपणा सुरु आहे, कुठं हे पाप फेडतील? नागपूरच्या आमदार निवासाचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलंय? त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी यावेळी पवार यांनी केलीय. ते म्हणाले, दोन […]
नागपूर : सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालावे म्हणून विरोधी पक्षातील आमदार प्रयत्न करतायत. अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात येत आहेत. मात्र सत्ता पक्षातील आमदारांनी दिशा सालियन मृत्य प्रकरणावरून नौटंकी चालवली आहे. अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. पवार म्हणाले, आम्ही सरकारमध्ये होतो. त्यामुळे दिशा सालियन हे प्रकरण सीबीआयकडे नेले. सीबीआयने तपास […]