मुंबई : राज्याचे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरु आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. सध्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी होत आहे. यातच राजकारणातील एक महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या ते नागपुरात असतील. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. दरम्यान राज्यातील अनेक दिग्गज […]
नवी दिल्ली : राज्यात पुन्हा एकदा गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे तसेच लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिला आहे. चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात देखील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहे. कोरोनाची साथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवर […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय नेत्यांकडून महापुरुष, संत, देवी देवतांबद्दल वादग्रस्त विधानं करण्यात येत आहेत. या पार्श्वभूीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे पक्षातील कार्यकर्त्यांना समज नाहीतर ताकीद दिलीय. ठाकरे यांनी पत्रात म्हंटले, “सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात […]
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजपच्या नेत्यांकडून अनेकदा महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने करण्यात आली. त्यावरुन राज्यभरात विरोधकांकडून अनेक आंदोलने, मोर्चे, प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन असे अनेक मोर्चे निघाले. नुकताच महाविकास आघाडी सरकारकडून सत्ताधारी सरकारविरोधात विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा अजेंडाच महापुरुषांबद्दल भाजपच्या नेत्यांकडून होत असलेली अवहेलना, अवमानकारक वक्तव्ये त्याचबरोबर एकमेकांशी तुलना भाजपच्या काही नेत्यांकडून करण्यात […]
पुणेः फुकटात काजू कतली दिली नाही म्हणून मिठाईच्या दुकानात गोळीबार करण्याचा प्रयत्न झालाय. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे दोन दिवसांपूर्वी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन साथीदाराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन […]
नागपूर : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित करून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अतुल भातकळकरांच्या या प्रकाराकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आहे. सभागृहातला सदस्यचं जर दुसऱ्या सन्माननीय सदस्याचा फोटो मॉर्फ करून सोशल मिडियावर […]