नागपूर : सीमावर्ती लोकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार पुर्णपणे उभा आहे. त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये, अशी आमची भूमिका असणार आहे. यासंदर्भात आज लोकतांत्रिक पद्धीतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याला परवानगी नाकारण्यात आली. या संदर्भातली चर्चा कर्नाकटच्या मुख्यमंत्र्यांशी करु, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषेदत दिली. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागाबाबत राज्याची भूमिका तसूभरही मागे […]
मुंबई : नाशिकच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या अडीच महिन्याच्या बाळासोबत विधानभवनात दाखल झाल्या. त्यामुळे त्यांनी एकाचवेळी आई आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी निभावली आहे. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले. करोना काळानंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर नागपूरमध्ये होणारं हे पहिलेच अधिवेशन आहे. यावेळी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधानभवनाची पायरी […]
पुणे : विविध मागण्यांसाठी पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन बघता पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. यामागण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्याने पोलिसांची मोठी पळापळ झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी वर्णनात्मक परीक्षेला आमचा विरोध नाही, मात्र त्यासाठी तयारी करण्यास पुरेसा वेळ आणि स्पर्धा समान पातळीवर असावी, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर नवीन पॅटर्न 2025 मध्ये लागू […]
नागपूर : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले. करोना काळानंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर नागपूरमध्ये होणारं हे पहिलेच अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कर्नाटक सीमावाद आणि कर्नाटक सरकारची भूमिका यावर विरोधी पक्ष आक्रमक झालेला पाहायला मिळाला. सीमावाद प्रकरणी कर्नाटकच्या बेळगाव जिल्हाधिकारी यांनी मंत्र्यांना बंदी कशी घातली, त्यांना कोणता अधिकार आहे? ही दडपशाही खपवून घेणार […]
मुंबई : अनेक अमराठी कलाकारांची पावलं मराठी चित्रपटसृष्टीच्या दिशेने वळत आहेत. तर अनेक जण मराठीत पदार्पण करण्याच्या प्रतिक्षेत आहेत. ‘सुर्या’ या आगामी मराठी चित्रपटात मराठमोळे अभिनेते हेमंत बिर्जे यांनी सोनं केलं आहे. नायक बनून सिनेसृष्टीत दाखल झालेल्या हेमंत यांनी मराठी सिनेसृष्टीत खलनायकाच्या भूमिकेतून पदार्पण केलं आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन […]
नागपूरः नागपूरला आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी राज्यातील अनेक प्रश्नांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. हे सरकार कोणाचे काही ऐकत तर केवळ गद्दार मंत्र्यांचे ऐकतात, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केलाय. महाराष्ट्रात अनेक मुद्दे समोर येत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे. पण […]