मुंबई : “जसं मांजरीनं स्वतःची पिल्ल खाती तसं राजू शेट्टी हा मांजरीची जात आहे. तो स्वतःची पिल्ल खातो. कार्यकर्ता मोठा नाही झाला पाहिजे, कार्यकर्त्याला काही मिळालं नाही पाहिजे, अशी भावना या माणसाच्या मनात असते”, असं म्हणत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju […]
अहमदनगर – राज्यातील सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या विचारावर चालणारे आहे. आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर कुणाचे डोळे जागेवर ठेवणार नाही.. या राज्यात औरंगजेबाचे (Aurangzeb) स्टेटस कोणाला ठेवता येणार नाही. आमच्या सर्वांचा एकच बाप ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्याला आम्ही […]
बीड : नाशिकनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दुसरी सभा बीडमध्ये होणार आहे. 17 ऑगस्टला त्यांची ही सभा पार पडणार आहे. या सभेच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी जिल्ह्यातील शरद पवार यांच्यासोबत असलेले एकमेव आमदार संदीप क्षीरसागर यांना देण्यात आली आहे. या निमित्ताने आता पवार येत्या काळात छगन भुजबळा यांच्यापाठोपाठ धनंजय मुंडे यांच्याविरोधात वातावरण तापविताना दिसून […]
Sujay Vikhe On Law of Love Jihad : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये आज हिंदू जनआक्रोश मोर्चार्चे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू माता भगिनींवरील होत असलेले अत्याचार लक्षात घेता लव्ह जिहादचा कायदा आणणे ही काळाची गरज आहे. अशा जन आक्रोश मोर्चातून याचीच मागणी होत असल्याचे खा. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. तसेच लव्ह जिहादचा कायदा संसदेत आणण्यासाठी […]
Nitesh Rane : सकल हिंदू समाजाच्या वतीने आज अहमदनगरमधील राहुरी येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा आरोप करत हिंदू संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलं. या मोर्चामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील सहभाग घेतला. या मोर्चाला नितेश राणे यांनी संबोधित केले. यावेळी राणे यांनी सांगितले की, लवकरच राज्यात […]
मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदानंतर आता काँग्रेसने विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदावरही दावा ठोकला आहे. काँग्रेसच्या 9 पैकी 6 आमदारांनी याबाबत थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहिलं आहे. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळताच उपसभपती नीलम गोऱ्हे यांच्याकडे यासाठी दावा करण्यात येणार आहे, अशी माहिती आहे. काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनीही या ‘लेट्सअप […]