पुणे : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्ग क्रमांक ६० वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश पुणे शहरचे पोलीस उप-आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी जारी केले आहेत. स्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून पुण्याकडून अहमदनगर बाजूकडे […]
मुंबई : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दिवंगत अभिनेत्रीची आई वनिता शर्मा यांनी यापूर्वीच तिचा सहकलाकार शेजान खानवर आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. शेजान खान पोलीस कोठडीत असून पोलीस या प्रकरणाच्या तपासात सातत्याने सक्रिय आहेत. दरम्यान, तुनिषा शर्माच्या आईने शेजान खानबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. वनिता शर्मा […]
नवी दिल्ली : सीबीएसईने दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १५ फेब्रुवारीपासून ही परीक्षा सुरू होणार आहेत. ‘सीबीएसई’ कडून दोन्ही बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रक पाहता येईल. CBSE १० वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ दरम्यान, तर १२वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते […]
नागपूर : कर्नाटक सरकारने आता महाराष्ट्राचे पाणी पळविण्याच्या प्रयत्न सुरु केला असून यामुळे राज्याचा पाणी हिस्सा आणि पर्यावरणाला ही धोका निर्माण होणार असल्याची बाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्य सरकारच्या लक्षात आणून दिले. विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, महाजन आयोगानुसार खानापूर तालुक्यातील 30 गावांचा समावेश […]
नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. आज देशात सत्तेत असलेल्या भाजपला एकेकाळी संपूर्ण बहुमताने सत्तेत यायला 2014 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती. आज जरी सत्तेत असले, काही काळ राहिले तरी एक ना एक दिवस सत्ता जात असते. प्रत्येकाचा दिवस येत असतात. आज सत्तेत असलेल्यांनी सत्तेचा दुरुपयोग करू नये. सत्तेच्या […]
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्वीट करून याची माहिती दिली. त्यानंतर राजकीय तसेच अन्य सर्वच क्षेत्रातील दिग्गजांकडून मोदींच्या मातोश्रींना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. यातच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. “माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री श्रीमती […]