मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा २०२१ च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये सांगली जिल्ह्यातील प्रमोद चौगुले (Pramod Chaugule) यांनी राज्यात सलग दुसऱ्यांदा पहिला क्रमांक पटकावला आहे. तर शुभम पाटील याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. महिला गटात सोनाली मात्रे यांनी पहिला क्रमांक मिळवला. तसेच आयोगाने संवर्गाच्या पसंतीक्रम सादर करण्यासाठी ३ […]
मुंबई : आठ महिन्यांत जाहीरातींवर सरकारकडून ५० कोटीं आणि मुंबई महापालिकेकडून १७ कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न गंभीर आहे. पगाराअभावी एसटी कर्मचाऱ्यांची कुटुंबं उपासमारीचा सामना करत असताना, राज्य शासन मात्र एसटीचे कोट्यवधी रुपये खर्चून पानभर जाहिराती प्रसिद्ध करत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हसऱ्या चेहऱ्याच्या दैनिकांच्या पहिल्या पानावरच्या या पानभर जाहिराती चीड […]
मुंबई : महागाई, बेरोजगारी, महापुरुषांची स्मारके, महामानवांचा अवमान यासह राज्यासमोरील महत्वाच्या, गंभीर प्रश्नांचा उल्लेख राज्यपालांच्या अभिषाणात नाही. सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा विसर सरकारला पडला आहे. सरकारच्या सुमार कामगिरीमुळे अनेक महत्वाचे विषय अभिभाषणात टाळले आहेत. महिलांवर हल्ले होत आहेत, पत्रकारांची हत्या होत आहे. जनतेच्या पैशांवर मंत्र्यांची उधळपट्टी सुरु आहे. सरकारची कामगिरी सुमार असल्याचे सांगत विधानसभेचे विरोधी […]
अहमदनगर : शिवसेनेतील खासदार, आमदार आणि इतर नेते उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सोडून गेल्यानंतर आता ठाकरे गट अॅक्शन मोडमध्ये आला. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने, ठाकरे गटाकडून शिवगर्जना अभियान हाती घेण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आज अहमदनगर शहरातील माऊली सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिवगर्जना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांची उपस्थिती […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) या आपल्या लहान बाळासह काल अधिवेशनात आल्या होत्या. राज्य सरकार तर्फे त्यांना थांबण्यासाठी विधीमंडळाच्या आवारात हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. परंतु काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अहिरे यांना थांबण्यासाठी देण्यात आलेल्या हिरकणी कक्षाची अवस्था अत्यंत खराब होती. त्या कक्षामध्ये सर्वत्र धुळ होती. अहिरे या आपल्या बाळाची […]
अहमदनगर : सरकारी आणि खासगी आस्थापनामध्ये हिरकणी कक्ष असावा ही कायद्यामध्ये तरतूद आहे. मात्र पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा हिरकणी कक्ष नाही. केवळ कागदावरती असणाऱ्या हिरकणी कक्षाचा स्तनदा मातांसाठी उपयोग होत नाही. आमदार सरोज अहिरे यांच्याबाबत जे घडल त्यासंदर्भात तेव्हा राज्य महिला आयोगाच्या वतीने विधान भवनातील कामकाज मंत्री यांना पत्र पाठवलेल आहे, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी […]